21.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहा:  जिल्हाधिकारी

गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहा:  जिल्हाधिकारी

बीड, दि.10 : गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी प्रगती सभागृहात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोदावरी नदीकाठच्या गांवाना सतर्कतेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तसेच दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण येथुन गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदी काठच्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यासाठीच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यातंर्गत जायकवाडी प्रकल्प येथुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू केल्यामुळे पिण्याचे स्त्रोत दुषीत झाल्यास पाणी पुरवठ्याचे शुद्धीकरण करणे, गरज पडल्यास टैंकर लावणे बाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालय यांच्या सोबत संपर्क ठेवून कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या कालावधीत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पोहोच होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित केले.

गोदावरी नदी किनारी असणाऱ्या लोकवस्तींना सावधगिरीच्या सुचना गावांमध्ये दवंडी देऊन व ईतर माध्यमातून देण्याचे ही निर्देशित केले.

अत्तिवृष्टीमध्ये सापांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्पदंश, डेंग्यूची लागण तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांकरीता इंजेक्शन, औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य येथे उपलब्ध राहील याची जिल्हा शल्यचिकित्सक, बीड व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षात घेण्याच्या सूचना केल्या .

नदीकाठी पाळीव जनावरे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बऱ्याचदा पाण्याचा प्रवाह जास्त असतो प्रवाहामध्ये जनावरांची सांगाडे वाहत येतात, त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

जायकवाडी प्रकल्पातून एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर खबरदारीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गावामध्ये अन्नधान्याची आगाऊ व्यवस्था करावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी गेवराई व माजलगांव या तालुक्यांसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून बाधित होणाऱ्या शेतक-यांबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशा महत्वाच्या सूचना यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!