महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.
कमी कालावधी मध्ये संघटनेचें काम उच्च शिखरावर,
संघटना बनली सेवानिवृत्त कुटुंबाची जिव्हाळ्याचा आधार देणारी संस्था.
माजलगाव (प्रतिनिधी) आज दिनांक ७ रविवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षक पतसंस्था माजलगाव येथे संघटनेचा प्रधम वर्धापन दिन साजरा करण्यात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी धाईजे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राज्य संघटक श्री बादाडे सर यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री घाटुळ सर यांनी केले प्रास्ताविक मध्ये त्यांनी संघटनेची माहिती दिली.आभार प्रदर्शन माजलगाव तालुका अध्यक्ष श्री कारंडे सर यांनी केले. अध्यक्षीय समारोपात श्री धाईजे सर यांनी आतापर्यंत संघटने केलेले कामं वपुढिल कामांची माहिती सांगीतली
कार्यक्रमाला त्या. कार्याध्यक्ष नवगनकर सर,ता.सचिव विष्णु करपे,केकाण विश्वनाथ, बट्टेवाड नागोराव, मोमीन समोदिन,विकार अहेमद,कांबळे कमलाकर, शेख दिलदार हे होते.कार्यक्रमाच्या शेवटी राज्य कार्यकारिणी व तालुका शाखा यांच्या व तिने स्वादिष्ट भोजन दान देण्यात आले.
श्री करंडे हरिदास.तालुका अध्यक्ष श्री बचुटे भिमराव जि.सरचिटनिस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.