अंबाजोगाई येथील मुख्य शाखेत आधार मल्टीस्टेट च्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) 5 सप्टेंबर रोजी आधार मल्टीस्टेट मुख्य कार्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने महिला बचत गटांना कर्ज वाटप व शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आधार मल्टीस्टेटचे ज्येष्ठ संचालक प्रा. डी.जी. धाकडे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे सर आदरणीय उत्तमरावजी डोंगरे सर व आधार मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुनील सौंदरमल हे होते. शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून देताना प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे सर म्हणाले की,गुरूंची गुरू ही माता असते सर्वप्रथम आई ही सर्वांचे गुरु असते आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.याप्रसंगी त्यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवुन देण्यात आले..
महिलांच्या हातामध्ये जर का व्यवहार दिला तर काटकसर करून महिला आपला प्रपंच चालवत असतात आणि म्हणून आधार मल्टीस्टेट ने महिलांना आधार देण्याचे काम केलेलं आहे. समाजातील सर्व महिलांनी आधार मल्टीस्टेट मध्ये खाते उघडावे व आधारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. धाकडे सर, उत्तमराव डोंगरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच बचत गटाच्या महिलांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कर्जाचा चेक वितरण करण्यात आले व उपस्थित शिक्षक बांधवांचा आधार परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्रीमान वरणे बालासाहेब, विकास वाघमारे सर, राजेश कापसे सर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उत्तमरावजी डोंगरे सर यांनी केले.