युवक तालुकाध्यक्ष पदी सुरेश गायकवाड व परमेश्वर खंडागळे यांची निवड
माजलगाव (रिपोर्टर):
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची माजलगाव पदाधिकारी निवड बैठक मराठवाडा संघटक राजाभाऊ खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली व युवक जिल्हाध्यक्ष नवनाथ कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विष्णू अवचार,वडवणी तालुकाध्यक्ष विलास कारके यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यात तालुक्यातील महत्त्वाच्या पदांच्या निवडी करण्यात आल्या.
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ने माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये जोर पकडला असून याच अनुषंगाने आज शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची पदाधिकाऱ्यांची निवड बैठक संपन्न झाली.यामध्ये सुरेश गायकवाड व परमेश्वर खंडागळे यांची युवक तालुकाध्यक्ष माजलगाव पदी निवड करण्यात आली. त्याच बरोबर कृष्णा खंडागळे यांची तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी,विशाल खंडागळे तालुका उपाध्यक्ष युवक माजलगाव,लक्ष्मण आवड तालुका सचिव माजलगाव, संदिपान खंडागळे तालुका उपाध्यक्ष माजलगाव,विजयकुमार पारवे तालुका कार्याध्यक्ष धारूर,रामेश्वर काळे युवक तालुका उपाध्यक्ष धारूर,अरुण काळे युवक तालुका संघटक धारूर,सुभाष शेवाळे पंचायत समिती सर्कल अध्यक्ष किटी आडगाव,प्रवीण खंडागळे युवक तालुका उपाध्यक्ष माजलगाव,कैलास उदारे सर्कल सचिव किटी आडगाव पदी सर्वांच्या निवडी करण्यात आल्या.
माजलगाव विधानसभा मतदार संघात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ची खूप मोठी ताकद असून या निवडीमुळे पक्षाला आणखीन बळ मिळाले आहे. निश्चितच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये डिपिआय निर्णायक भूमिका पार पाडणार.
नवनाथ कांबळे
डिपिआय युवक जिल्हाध्यक्ष बीड