अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा…
किसान सभेची निवेदनाद्वारे मागणी…
माजलगाव( प्रतिनिधी)
माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील सर्व महसुल मंडळात दोनवेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शेतक-याच्या हाता तोंडासी आलेल्या पिकाचे शेतातुन पाणी पाहुन गेल्यामुळे व पाणी साचल्यामुळे पुर्ण पणे खरीपाचे पिक हातातुन गेले आहे यामुळे तिनही तालुक्यात तात्काळ पंचनामे करूण शेतक-यांना अनुदान द्यावे तसेच विमा कंपनीलापण तात्काळ आदेशीत करूण सन २०२४ चा खरीप विमा शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभाचे तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके सचिव ऍड अशोक डाके यांनी उपविभागीयधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे..
दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की,
सन २०२३ चे अनुदान मा. मुख्यमंत्री मोहदयांनी परळी येथील कृषी मोहत्सवात जाहिर केल्या प्रमाणे ई – पिक पाहाणीची अट रद्द करूण सर्व शेतक-यांना सरसगट द्यावे तसेच सन २०२३ मधील सोयाबीन चा ७५ टक्के विमा तात्काळ शेतक-यांच्याखात्यावर वर्ग करावा,शेतक-यांच्या सोयाबीनला प्रती क्यिटल ७०००/- भाव व कापसाला प्रती क्यिटल १२०००/- हजार रूपये भाव जाहिर करावा, खरिप २०२४ चा नित्रुड मंडळातील अतिवर्ष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाला २५% अग्रीम मंजूर करून तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, अतीवर्ष्टीने नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतक-यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, माजलगाव विधानसभा क्षेत्रातील मोदी आवास योजनेचे घरकुलचे हप्ते लाभार्थीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावे,खामगाव – पंढरपुर रोड वरील मौजे नित्रुड येथे तात्काळ गतीरोधक बसवीण्यात यावे,मौजे नित्रुड व सर्व तांडे/वाडी/वस्ती, राजेवाडी, टालेवाडी मंजुर गावठाण फिडरचे काम तात्काळ चालु करण्यात यावे (म.रा.वि.वि कंपनी तेलगाव यांनी),महात्मागांधी राष्ट्रीग्रामीन रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तीक जलसींचन विहिरीचे (हप्ते) अनुदान तात्काळ लाभार्थी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,नित्रुड ते चंद्रभान तांडा, मोहकुळ तांडा जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, नित्रुड ते शेरी तांडा जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, नित्रुड ते बडेवाडी जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, नित्रुड ते नाकलगाव जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, टालेवाडी ते नित्रुड (जान्नुनाईक तांडा) जाणा-या रस्त्याची दुरूस्ती करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा ९ सप्टेंबर २०२४ रोजी नित्रुड येथे माजलगाव तेलगाव महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेचे कॉ दत्ता डाके ऍड अशोक डाके, कॉ कृष्णा सोळंके ,पोपट गायकवाड,राहुल आव्हाड,विकास डाके यांनी दिला आहे.