संत रोहीदास महामंडळाची कर्ज योजना, चांभार, मोची, ढोर, व होलार या जाती करीता काय आहे ?
बीड, दि. 3 विशेष घटक योजना 20 भांडवल योजना 16 मुदती कर्ज योजना 32 लघुऋण वित्त योजना 50 महिला अधिकारीता योजना 2 महिला समृद्धी योजना 41 शैक्षणिक कर्ज योजना 20 महामंडळाच्या वरील शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, व होलार) असावा. तसेच त्याने यापूर्वी महामंडळाच्या व इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभ घेऊ इच्छीणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून कर्ज प्रस्ताव प्रत्येकी तीन प्रतीत टंकलिखित किंवा छापील स्वरूपात खालील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
कर्ज प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे,
1) उत्पन्नाचा दाखला, 2) राशन कार्ड,मतदान किंवा आधार कार्ड, 3) शाळेचा पुरावा, 4) उद्योग आधार प्रमाणपत्र, 5) तीन फोटो, दर पत्रक जीएसटी सह, 6) प्रकल्प अहवाल, 7) जागेचा पुरावा लाईट बिल, टॅक्स पावती, नमुना नंबर 08 11), 8 ) सिबिल रिपोर्ट 9) ,रहिवाशी व नाहरकत प्रमाणपत्र,10) दोन शासकीय कर्मचारी अथवा प्रॉपटीधारक जामिनदार,11) बॅक पासबुक, व्यवसाय जागेचा फोटो, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी सर्व दस्ताऐवज स्वत: प्रमाणित (Self attested) करुनच जिल्हा कार्यालयात सादर करावेत
वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील छायांकित प्रत केलेले अर्ज ही बातमी प्रसिध्द झाल्यापासून पुढील 01 महिन्यापर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 10.00 ते 5.30 पर्यंत) जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, नगर रोड, बीड 431122 दूरध्वनी क्रमांक 02442-299187 या ठिकाणी कर्ज प्रस्ताव स्वतः प्रत्यक्ष अर्जदाराकडून स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.
टीप विशेष घटक व बीज भांडवल योजनेअंतर्गत महामंडळात यापूर्वी दाखल केले सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येतील.