राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते “उत्कृष्ट भाषण पुरस्कार” ने आ.प्रकाश दादा सोळंके सन्मानित
माजलगाव मतदारसंघातील हा पुरस्कार माझा नसून जनतेचा पुरस्कार ! आ. प्रकाश दादा सोळंके
मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रकुल संसदीय मंडळ ,महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२० – २१ करिता देण्यात येणारा “उत्कृष्ट भाषण पुरस्कार” मा.राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते विधिमंडळ मुंबई येथे स्वीकारला.

चौथ्यांदा आमदार म्हणून माजलगाव मतदारसंघातील जनतेने मला काम करण्याची संधी दिली,राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पाठवले.आजचा पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा पुरस्कार आहे.आमदार म्हणून सभागृहात लोकांच्या न्यायासाठी,लोकांच्या मूलभूत सुविधांसाठी , शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकास कामांसाठी बोलता आले.लक्षवेधीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकलो.आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझा नसून तो पुरस्कार माझ्या मतदारसंघांतील जनतेचा पुरस्कार आहे अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्या नंतर आ.प्रकाश( दादा)सोळंके व्यक्त केली.