आई,…च्या आशीर्वादाने नवीन व्यवसाय.मध्ये तरुणाचे पदार्पण.
आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करून उद्योगास बहर आणलेले सावरगावतील युवा उद्योजक. गाहिनाथ कांबळे
साई ग्राफिक्स अँड एल ई डी बोर्ड व्यवसायात उत्तुंग भरारी
भव्य उदघाटन सोहळा दि 4/9/2024 रोजी गढी रोड ट्रेण्ड जवळ माजलगाव
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावरगाव येथील अशोक कांबळे यांनी काही वर्षा पूर्वी साई ग्राफिक्स व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून ग्राहकांना आपल्या त्यांच्या आवडीचे कामे करून दिल्यामुळे अनेक ग्राहक जोडून ठेवण्यास साई ग्राफिक्स फर्म वचन बद्ध राहिले. आज याच ग्राहकांच्या विश्र्वासवर साई ग्राफिक्स फर्म ने दुसऱ्या व्यवसायात पदार्पण केले आहे यांचे उद्घाटन दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता होत आहे. यां उद्घाटन हे कोण्या राजकीय पुढाऱ्यांच्या हसते केलें जातं नसुन आपल्या आई च्या हस्ते उद्घाटन ठेवून पुढील कार्यास सुरुवात करीत असल्याचे ,साई led बोर्ड .यां फर्म चे संचालक गाहिनाथ कांबळे यांनी सांगितले तसेच सर्व मित्रमंडळी यांनी कार्यक्रमास उपस्थिति लावावी.