माजलगाव न.प.मुख्याधिकारी श्री. चंद्रकांत चव्हाण सतत गैरहजर, जनतेचे कामे खोळंबली, प्रशासकाची नियुक्ती करा; कचरू (तात्या) खळगे
माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव न.प.चे मुख्याधिकारी श्री चंद्रकांत चव्हाण यांनी पदभार घेतल्यापासुन आजपर्यंत या न.प. मध्ये नागरी सुविधाच्या आभाव निर्माण झाला असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले सदर मुख्याधिकारी कायम कार्यालयात गैरहजर राहतात फक्त आर्थिक लाभाचे काम करण्यासाठी शहरात येऊन आज्ञात ठिकाणी थांबुन धनादेश, मोजमाप पुस्तीका (M.B.) यावर सह्याकरण्यासाठी येतात ते कधिच कार्यालयात येत नाहीत. त्यांच्या या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून माजलगाव न. प. वर प्रशासक नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कचरू तात्या खळगे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय फंड आलेला आसुन तो फक्त कागदावर खर्च करण्यात हे मुख्याधिकारी पटाईत आहेत. याचाच एक भाग म्हणुन प्रभाग क्र.७ या मागास्वर्गीय वस्तीमध्ये अपुर्ण रोड झालेले असतांना पुर्ण रोड झाले असे दाखवुन बिल आदा करण्यात आले आहे. तसेच याच प्रभागात कुठेही नाली बांधकाम झाले नसतांना नाली झाली असे दाखवुन बील अदा केले आहे. याच पद्धतीने शहरात रोड (सिमेंट) चे झाले असले तरी ते सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. काही भागात तर रस्ते न करताच बिले उचलेले आहेत. मागास्वर्गीय वस्तीमध्ये आलेले आर्थिक तरतुद (बजेट) इतर ठिकाणी कामे दाखवुन परस्पर बिले उचलण्यात आलेले आहेत.
सदरील मुख्याधिकारी कार्यालय कधिच हजर राहत नाहीत, तसेच ते भ्रष्ट आसत्यामुळे न.प.चे काम रामभरोसे चालु आहे. कुठलेही नियमात असलेले काम सहजासहजी होत नाही. पण आर्थिक देवान घेवान केल्यास नियम बाह्य काम ही तात्त्काळ करण्यात येते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे माजलगांव शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असुन शहरात साथीचे रोग सुरु आहेत. पाणी पुरवठा दुषीत होत असुन १५ दिवसातुन एकदा पाणी शहर वासियांना मिळते नळयोजना जागोजागी लिकेज असुन हे दुरुस्तीचे काम एका एजन्सीला दिले असुन ते कधिच करण्यात येत नाही. शहरातील रस्त्यावरी पथदिवे बंद असल्याने शहरात रात्रीचे फिरणे मुस्किल होत आहे. रस्त्यावर कुत्रे व जनावरांचा सुळसुळी झाला असुन याकडे न.प.चे पुर्ण दुर्लक्ष झालेले आहे.
तरी नगर परिषद मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या गैरहजर राहण्याची चौकशी करून वरील सर्व मागण्या सोडविण्यात यावे तसेच त्यांच्यावर कार्यवाही होई पर्यंत या ठिकाणी एका सक्षम प्रशासकाची नियुक्ती करावी.
नसता लोकशाही मागनि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात असा इशाराही या निवेदनात देण्यात आला असून या निवेदनावर खळगे यांची सही आहे. दे