‘पल्स केअर’ हॉस्पिटल चे थाटात उद्घाटन
माजलगाव जिल्ह्यातील विकासाचं केंद्र व्हावं यासाठी प्रयत्न करणार – आ. प्रकाश दादा सोळंके
बीड दि.11(प्रतिनिधी):केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने माजलगाव मतदार संघात विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. हे शहर बीड जिल्ह्यातील विकासाचं केंद्र व्हावं यासाठी मी आमदार या नात्याने प्रयत्न करणार आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था ही पहिल्यापेक्षा अधिक सक्षम होत आहे. माझ्या परिवारातील एक सदस्य डॉ. शेख मोहम्मद तौसीफ याने ‘पल्स केअर’ हे तीस बेड चे हॉस्पिटल उघडले याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवोदगार कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री तथा आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी काढले.माजलगाव तालुक्यातील भूमिपुत्र डॉ. शेख मोहम्मद तौसीफ वासेफोद्दीन (एमबीबीएस, जनरल फिजीशीयन व कन्सल्टींग डायबेटोलॉजीस्ट) यांच्या ‘पल्स केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 10) रोजी दुपारी पार पडला. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना आ. सोळंके बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिति चे अध्यक्ष ओमप्रकाशजी शेटे हे होते. याप्रसंगी बहुजन विकास मोर्चा चे संस्थापक बाबूराव पोटभरे, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस, नितीन नाईकनवरे, माजी जिला शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, राष्ट्रवादी कांग्रेस चे वरिष्ठ नेते अच्युतराव लाटे, आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे, माजी नगराध्यक्ष नासेर पठाण, छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनदादा जगताप आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. सोळंके म्हणाले की, मी 1999 मध्ये या शहरात आलो. ते आजतागायत खूप बदल झाले. हे शहर गतीने वाढणारं शहर असून शांततेत जगणार शहर आहे. येथील जनतेच माझ्यावरती विश्वास आहे म्हणून मला आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून दिले आहे. नसता माजलगावची परंपरा आहे. एकदा आमदार झालं की घरी नंतर नाव ही काढत नाहीत. असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. मतदार संघात जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करता येतील, शेतीवर आधारित बहुसंख्य वर्ग कसा सुखी समाधानी करता येईल यासाठी माझा प्रयत्न असतो असे सांगून त्यांनी शासनाच्या प्रयत्नातुन आरोग्य व सिंचन सुविधा कशा उपलब्ध केल्या जात आहेत हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिति चे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाशजी शेटे म्हणाले की, पैसा कमाविण्याचे विविध प्रकार आहेत. एक तर लोकांचे श्राप किंवा आशीर्वाद घेऊन पैसा कमावला जातो. मात्र आरोग्यसेवेचा उद्देश्य शुद्ध असेल तर तो डॉक्टर माणूसकी ने जिवंत असतो. डॉ. तौसीफ हे माजलगावात अत्याधुनिक सुविधानीयुक्त असे हॉस्पिटल उभे केले. आपण ‘पल्स केअर’ च्या माध्यमातून जनसेवा भावनेतून कार्य करणार आहात ही कौतुकास्पद बाब आहे असे विचार व्यक्त केले.पुढे बोलताना डॉ.शेटे म्हणाले की, समाजातील गरीब व सर्व सामान्य लोकांमध्ये शासकीय योजना बाबत जनजागृतीचा आभाव आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व रेशन कार्डधारक पात्र असतील. एका कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत योजनेमार्फत करण्यात येते. प्रत्येक नागरिकापर्यंत आयुष्मान भारत योजेनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल. या योजना राबविण्यासाठी अशा हॉस्पिटलची नितांत गरज आहे. डॉ. शेख मोहम्मद तौसीफ व डॉ. आफरीन तौसीफ शेख यांनी शहरात सुसज्य हॉस्पिटल उभारले त्यांनी रितसर अर्ज करावा मी सहकार्य करीन.
कार्यक्रमाची प्रस्तावना ‘पल्स केअर’ हॉस्पिटल चे संचालक डॉ. शेख मोहम्मद तौसीफ यांनी केली. यात त्यांनी आपला आरोग्य सेवेतील अनुभव सांगीतला. मी मेट्रो सीटीत हॉस्पिटल उघडलो असतो मात्र माजलगाव शहरवासीयांच्या सेवेखातर व आ. प्रकाशदादा सोळंके, मंगलताई सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल सुरुवात करत आहे असे ते म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्यास मा.आ.राधाकृष्णअण्णा होके पाटील, मा. आ. मोहनकाका सोळंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकरराव घुबडे, पात्रुड चे सरपंच मोमीन लतीफ, वंचित बहुजन आघाडी चे अंकुशराव जाधव, तालुका भगवंतराव भोसले, नगरसेवक सय्यद राज अहेमद, मुजम्मिल पटेल,खलील पटेल यांनी ही आपली उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. ‘पल्स केअर’या हॉस्पिटल मध्ये डॉ. शेख मोहम्मद तौसीफ वासिफोद्दीन (ज. फिजिशियन आणि कन्सल्टिंग डायबेटोलॉजिस्ट) यांचे सह तज्ञ डॉ. आफरीन तौसीफ शेख, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा चव्हाण, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. युवराज कोल्हे, डॉ. संकेत बाहेती, डॉ. राहुल उगले, एमएस (जनरल सर्जन), डीआरएनबी यूरोलॉजी यूरोलॉजिस्ट डॉ. भुक्तार आनंद लिंबाजी हे रुण सेवा देणार आहेत. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन नारायण झोडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शेख वासेफोद्दीन यांनी केले.