आझाद क्रांती सेना हे फक्त नाव नसून हा एक विचार आहे : राजेश घोडे
आझाद क्रांती सेनेची डाके पिंपरी येथे शाखा स्थापन.
माजलगाव (प्रतिनिधी) दिनांक 31 जुलै 2025 रोजी तालुक्यातील डाके पिंपरी या ठिकाणी आझाद क्रांती सेना ची शाखा स्थापन करण्यात आली तेथील युवकांनी आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेश घोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भव्य शाखा स्थापन केली.
या शाखेचे उद्घाटन माजलगाव तालुकाप्रमुख अशोक ढगे यांच्या हस्ते करण्यात आले . डाके पिंपरी येथील असंख्य युवकांनी आझाद क्रांती सेनेमध्ये प्रवेश घेतला या शाखा उद्घाटन प्रसंगी सेनाप्रमुख राजेश घोडे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की, विषमतावादी व्यवस्था संपवण्यासाठी बंड करावे लागेल गरीब हा गरीब होत चालला आहे व श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. देशात एक वेगळी विषमता निर्माण होत चालली आहे. ही विषमता संपवण्यासाठी आझाद क्रांती सेनेची मशाल आपण आज हातात घेतली आहे ही मशाल तुम्ही तेवत ठेवा या मशालीमध्ये आम्ही आमच्या रक्ताचं तेल करून टाकून ती ज्वलंत ठेवू आझाद क्रांती सेना हे फक्त नाव नसून हा एक विचार आहे. जो विस्थापित कुसाबाहेरील गरीब वंचित शोषितांचा आवाज म्हणजे आझाद क्रांतीसेना आहे या संघटनेमध्ये अठरापगड जमातींना घेऊन हे संघटन मागासलेल्या समाजाला शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आझाद क्रांती सेनेचा जन्म झालेला आहे. असे मत आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे यांनी व्यक्त केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी अशोक ढगे किसन भिसे शाहीर साळवे यांचीही भाषणे झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच रमेश जी आल्हाट जेष्ठ नागरिक युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नऊ चेतन घेऊन सामील झाला होता शहरांमधून भव्य मोटर सायकल रॅली काढून डाके पिंपरी येथे शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी शाखेचे (अध्यक्ष) गणेश आल्हाट (उपाध्यक्ष) लखन आलाट (महासचिव) बालासाहेब आल्हाट (सहसचिव) हनुमंत आढागळे (सल्लागार) राम शेरकर (कोषाध्यक्ष) बालासाहेब आल्हाट (सहसंघटक) भागवत घोंगडे असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी परिश्रम घेतले