23.6 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

कास्ट्राईबची जिल्हास्तरीय सहविचार सभा संपन्न! कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काचं संघटन : बाळासाहेब सोनवणे

कास्ट्राईबची जिल्हास्तरीय सहविचार सभा संपन्न!
कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काचं संघटन : बाळासाहेब सोनवणे.

माजलगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय सहविचार सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे उत्साहात संपन्न झाली.या सभेमध्ये विविध विभागातील कास्ट्राईब कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजलगाव महासंघाचे तालुकाध्यक्ष राहुल टाकणखार होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावडे यांनी तर प्रस्ताविक भारत टाकणखार यांनी केले.यावेळी महासंघाचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत जोगदंड,लातूर विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे,माजी जिल्हाध्यक्ष रमेश माटे,दिनकर जोगदंड जिल्हाध्यक्ष केशव आठवले,सुमेध जोगदंड,डॉ संतोष बोबडे,बप्पाजी कदम,बा.म.पवार,संतोष दाणी,यशवंत सर,राजकुमार सोनवणे तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या सहविचार सभेत कास्ट्राईब कर्मचार्‍यांच्या सेवाशर्ती, पदोन्नतीतील अडचणी, सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ, आधार कार्ड आधारित संच मान्यता रद्द करणे,जुनी पेन्शन आदी तसेच संघटनेच्या भविष्यातील दिशा व मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्ययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.कर्मचारी वर्गास भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडून त्यावर उपाययोजनांचा ठोस आराखडा ठरविण्यात आला.
सभेच्या शेवटी एकमताने ठराव संमत करण्यात आला की, कास्ट्राईब कर्मचार्‍यांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल व शासन दरबारी संघटनेचा आवाज ठामपणे मांडला जाईल.
सहविचार सभेचा समारोप करताना मा.सूर्यकांत जोगदंड व बालासाहेब सोनवणे या दोघांनीही एकमताने सांगितले की,”कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी संघटना कटिबद्ध असून,प्रशासनासमोर ठोस भूमिका घेण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे अत्यावश्यक आहे.”
या सहविचार सभेमध्ये चि. रोहित पुष्पा राजकुमार सोनवणे यांची एम पी एस सी ग्रुप सी मंत्रालयीन क्लार्क अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रमेश डोंगरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाखंडाची पुस्तके भेट दिल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रतीक स्वामी यांनी केले.सहविचार सभेस राहुल पोटभरे,विलास जोगदंड,नितीन महुवाले,गौतम जोगदंड,सोनेराव लगस्कर,दीपक गायकवाड,एम एस गायकवाड,प्रा आचार्य सर, मस्के सर,यशवंत कदम,अनिल शिंदे,नितीन धिवार,मनोज वाघमारे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमंत पांढरपोटे,वसंत टाकणखार, नारायण भाळशंकर,प्रवीण जाधव,राजेंद्र सातपुते,आजीमोद्दीन खतीब,रवी आदमाने,गवळी सर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!