पोलीस अधिक्षक मा.नवनीत कावत यांच्या पॉवरफूल कार्याची जिल्हा वाशीया कडून दखल;माजलगाव संवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद
पो.अधिक्षक मा.नवनीत कावत हे पोलीस दलात नवा जोश निर्माण करणारे प्रेरणादायी अधिकारी : पो. नि. राहुल सूर्यतळ
माजलगाव (प्रतिनिधी) दि.5 कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायचे काम पोलीस करत असतात.तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे.परंतु यासाठी जनतेच्या सहकार्याचीही गरज असते. आपल्या अडचणी पोलिसांना सांगत जा,बीड पोलीस दल आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. जनतेशी संवाद करण्यासाठीच पोलीस दलाची ही संवाद यात्रा आहे.असे प्रतिपादन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले.माजलगाव शहरात पोलीस संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे माजलगाव शहर पोलिसांच्या वतीने पोलीस संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक,चेतना तिडके,शहर पोलीस स्टेशनचे पो.नि.राहुल सुर्यतळ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि.बालक कोळी,उप पोनि माकने,उपपोनि केंद्रे,उप पोनि दिंडे, यासह माजलगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस संवाद यात्रेनिमित्त उपस्थित नागरिकांनी आपल्या परिसरातील तालुक्यातील अनेक कायदेशीर समस्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केले.काही प्रश्न सुचवले.तर काही प्रश्नाबाबत पोलिसांकडून अपेक्षा व्यक्त केल्या.या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर पोलीस अधीक्षक कावत यांनी देन्याचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना कावत यांनी सांगितले कि.नशा मुक्तीसाठी पोलिसांसोबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.व्यसनाधीन मुला-मुलींना कायद्याच्या बडग्याची गरज असतेच.परंतु पालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलांवर निगराणी ठेवली पाहिजे. त्यांना आरोपी प्रमाणे नाही तर समुपदेशाने समाजशील बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.दरम्यान यावेळी त्यांनी जिल्ह्यातील क्राईम रेट कमी झाल्याचे सांगत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातले पोलिसांचे संख्याबळ वाढल्याचेही सांगितले. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगत जा.तिथेही आपले समाधान होत नसेल तर डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा असे आवहान ही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
या पोलीस संवाद यात्रेला,ज्येष्ठ नेते दयानंद स्वामी,मा.नगराध्यक्ष सहाल चाऊस,सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वीरेंद्र सोळंके,मा.नगराध्यक्ष शेख मंजूर, राजेश साळवे,नवनाथ धायजे, वंचितचे नेते अंकुश जाधव,शेख बाबा,धम्मानंद साळवे,मुजम्मिल पटेल,डॉ.मनसरदार,लतीफ मोमीन, ऍड.सुजित कांबळे,सुभाष नागलगावकर,एकनाथ मस्के, अविनाश बनसोडे,शेख फिरोज, तोफिक पटेल,इंद्रिस पाशा, फारुख अण्णा,नुर आतार,सौ. परवीन बाजी,सौ.रेखा आंबूरे, सौ.कोमटवार इत्यादी स्त्री पुरुष नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
पो.नि.राहुल सूर्यतळ यांच्या कामाचे पोलीस अधीक्षक यांच्या कडून कौतुक.
पोलीस संवाद यात्रेत उपस्थित नागरिकांनी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या कामाचे कौतुक केले.राहुल सूर्यतळ यांनी शहर पोलीस स्टेशनच्या पदभार हाती घेतल्यापासून शहराला एक वेगळी शिस्त लागल्याचे पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले.कायदेशीर कामात कसे सहकार्य केले न्याय मिळवून देण्याचा कसा प्रयत्न केला.असे म्हणत पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक केले.