गुरुमाऊली कॉलेज ऑफ नर्सिंग येथे जागतिक परिचारिका दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ संपन्न
माजलगाव ( प्रतिनिधी) संपूर्ण जगामध्ये स्वास्थ्य व्यवस्थेतील परिचारिकांचे उल्लेखनीय महत्त्व व अतुल्य योगदान याची दखल घेण्यासाठी इसवी सन 1854 पासून जागतिक परिचारिका दिन हा साजरा करण्यात येतो. यावर्षी गुरुमाऊली कॉलेज ऑफ नर्सिंग माजलगाव येथे जागतिक परिचारिका दिन, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या विशेष दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले यामध्ये विद्यार्थ्यांना मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच त्यानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या बीएससी नर्सिंग च्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल नुकताच लागला या मधे महाविद्यालयाच्या ७५ टक्के निकाल लागला व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षी कठीण परिस्थितीशी सामना करत ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर विशेष प्राविण्य घेत अनुक्रमे प्रथम क्रमांक निकिता राठोड द्वितीय क्रमांक आकांक्षा भालेराव तृतीय क्रमांक आरती नागरगोजे या विद्यार्थ्यांना विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी गुरुकृपा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.यशवंतराजे भोसले प्राचार्य निर्मला मॅडम फार्मसी प्राचार्य अमित बिंदू सर उपप्राचार्या पूनम खानापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते