उपविभागीय अधिकारी मा.गौरव इंगोले यांच्याकडून सपत्नीक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
माजलगाव ( प्रतिनिधी) भारतरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त श्रावस्ती बुद्धविहार, केसापुरी वसाहत माजलगाव येथे सदधम्म सेवा संघ माजलगाव आयोजित भारतरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा गौरवजी इंगोले यांनी सपत्नीक महामानवास अभिवादन केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ,संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्या सह बहूसंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती . सर्वांच्या उपस्थितीत महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.