प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरासाठीच खर्च करावा -जिल्हाधिकारी अविनाश पाठक
बीड दि. 22 :- घर म्हणजे आपल्या हक्काच असावे अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते पण आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. स्वत:च्या घरात रमण्याचा आनंदच काही वेगळा असतो, कुंटूंबातील वाढत्या जबाबदा-या, मुला मुलींचे शिक्षण, लग्न इतर खर्चाने माणूस कोलमडून जातो अन् घर असावे घरासारखे हे स्वप्न सत्यात न उतरता नुसते स्वप्नच राहते, हक्काचा निवारा, घरकुल मिळवून देण्याचे काम प्रधानमंत्री अवास योजनेमूळे लाभार्थीचे स्वप्न साकार झाले असून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरातील गृहीणीने घरा साठीच खर्च करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या 40 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे निधी वितरित प्रमाणपत्रा प्रसंगी काढले.
जिल्हाधिकारी श्री. पाठक म्हणाले की, शासनाचा निधी ज्या गतीने मिळतो त्याच गतीने आपण स्वत: लक्ष घालून घरकुल पूर्ण करावे, आपल्या घराची वीट आपण स्वत:च रचावी, महिलांनी या पैशाचा उपयोग इतर खर्चासाठी न करता आपल्या जवळची जमा पुंजी घरासाठी वापरुन यंदाची दिवाळी आपण आपल्या हक्काच्या घरात साजरी करावी.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. उल्हास गंडाळ, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोकाटे आणि संबधित अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.
घरकुल योजनेसाठी उत्कृष्ट काम करणा-या कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी श्री. पाठक यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका संगितादेवी पाटील यांनी केले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (टप्पा – 2) च्या अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण कळ दाबून केले. हा कार्यक्रम पुणे येथून दुरदृश्य प्रणालीव्दारे प्रक्षेपित करण्यात आला.