जप्त केलेली वाळू शासकीय घरकुल लाभार्थ्याना द्या; मंत्री पंकजाताई मुंडे
बीड( प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकार कडून विविध योजने अंतर्गत गोर गरीब लोकांना रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना सह घरकुल योजना राबवण्यात येत आहेत.सध्या वाळू अभावी घरकुल लाभार्थ्याना घरकुल बांधण्याचे काम थंड झाले आहे.घराचे अर्धवट स्वप्न पुर्ण होण्यासाठी उपलब्ध बांधकाम सामग्री मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी हतबल झाले आहेत.यामुळे तहसीलच्या अधिरिकत मध्ये जप्त केलेली वाळू शासकीय घरकुल करिता उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी बैठकीत केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सांगितले की,जिल्हयातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खननामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, अवैध पध्दतीने डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच औष्णिक वीज प्रकल्प, परळी येथे होणा-या राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सूचना केल्या.
वीट भट्या आणि औष्णिक वीज केंद्रातील राखेचे मोकळया हायवामधून होणा-या अवैध वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातवरणीय बदल रोखण्यासाठी बंद हायवामधून ही वाहतूक होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, तसेच जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्यावी, डोंगराचे अवैध उत्खनन करणारांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना यावेळी दिल्या.