विद्यार्थ्यांनी व्यसनाला दूर ठेवले तरच भविष्य उज्ज्वल पो.नि. राहुल सूर्यतळ
माजलगाव( प्रतिनिधी) : आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यसनापासून दूर राहिले तर आपण करियर घडवू शकतो असे प्रतिपादन माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी केले. सिद्धेश्वर महाविद्यालयाच्यावार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपात ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रकाश दुगड, अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, डॉ. रमेश गटकळ, प्रा. प्रतिभा जाधव यांचीयांची उपस्थिती होती. समारोप सत्रात मोहिनी पायघननसह वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा वक्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मानवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी होती. अध्यक्ष प्रकाश दुगड म्हणाले की, आजच्या तरुणांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला तर ते आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतील. प्रास्ताविकस्नेहसंमेलन प्रमुख डॉ. रमेश गटकळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर व डॉ. ज्ञानेश्वर गवते यांनी केले. आभार स्नेहसंमेलन सहप्रमुख प्रा. प्रतिभा जाधव यांनी मानले. बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थ्यांचाउत्साह मोठ्या प्रमाणात होता.