पत्रकार अरविंद ओव्हाळ यांना मुकनायक पुरस्कार जाहीर
माजलगाव / प्रतिनिधी :माजलगाव येथील धडाडीचे युवा पञकार अरविंद ओव्हाळ यांना माजलगाव येथील निर्भिड पत्रकार संघाचा यंदाचा मानाचा व प्रतिष्ठेचा मुकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला.याबद्दल ओव्हाळ यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.गेल्या दोन अडीच दशकांपासुन माजलगाव तालुक्यातील पत्रकारितेत सक्रिय असलेले व सध्या दै.वास्तवचे उपसंपादक म्हणून काम करत असलेले धडाडीचे युवा पत्रकार अरविंद ओव्हाळ यांनी पत्रकार म्हणुन काम करत असताना तालुक्यातील विविध सामाजिक व जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. सडेतोड बातम्यांच्या माध्यमातुन त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. ते ध्येयनिष्ठ व सडेतोड लिखाण करणारे पत्रकार म्हणुन सर्व परिचित आहेत. ओव्हाळ यांचे कार्य समाजहिताचे असल्याने त्यांच्या कार्याची माजलगाव येथील निर्भिड पत्रकार संघाने दखल घेत या पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मुकनायक पुरस्कारासाठी यंदा अरविंद ओव्हाळ यांची निवड केली.अरविंद ओव्हाळ यांना निर्भिड पत्रकार संघाचा मानाचा व प्रतिष्ठेचा मुकनायक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पत्रकार क्षेत्रातील पत्रकारांसह इतर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.