श्री गंगाधर वानोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बीड (प्रतिनिधी): तालुक्यातील बोरवाडीचे भूमिपुत्र तथा सातारा, बीड व सध्या जालना जिल्हा परिषद शिक्षण सेवेत कार्यरत असलेले नवोपक्रमशील, प्रयोगशील शिशक तथा भोकर तालुका आदिवासी समाजाचे समन्वयक, माझा गाव सुंदर गाव गारगोटवाडीचे समन्वयक, लोकसेवा संस्थेचे सचिव, प्रयोगशील उपक्रमशील शिक्षक गंगाधर यशवंतराव वानोळे यांना शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बीड जिल्ह्यातील मातृभूमी प्रतिष्ठानने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कर्याचा गौरव केला.
हभप.मोहन महाराज खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी,२०२५ रोजी बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. सुप्रसिद्ध कीर्तनकार महंत हभप.राधाताई सानप महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
माजी आमदार ॲड.उषाताई दराडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राचार्य डी.जी.तांदळे, उद्योजक इंजि.उत्तमराव मिसाळ, संपादक प्रा. ज्ञानेश्वर वाघ, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, प्रा.बाळासाहेब नागरगोजे, पांडुरंग जायभाये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात वानोळे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील १७ शिक्षक – शिक्षिकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर अन्य क्षेत्रातील १५ नामवंतांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रामदास हांगे, रामदास आमले, सुभाष वानोळे,गंगाधर डवरे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त गंगाधर वानोळे यांची प्रतिक्रिया…
मातृभूमी प्रतिष्ठानने पात्र समजून जो राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. तो केवळ माझा नसून मला घडवलेले गुरुजन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुकडेगाव, हरिश्चंद्र पिंपरी, पिंपरी बु., नाकलगाव, पाटोदा येथील माझे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, अधिकारी, गावकरी तसेच सामाजिक कार्यातील मार्गदर्शक, माझे गावकरी व मराठवाड्यातील सहकारी या सर्वांचा सन्मान आहे. मातृभूमी प्रतिष्ठानचे आभार मानून पुरस्काराने अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त गंगाधर वानोळे यांनी दिली.