श्री मंगलनाथ मल्टिस्टेट ची दिनदर्शिका प्रकाशित...
श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या शुभ हस्ते झाले प्रकाशन …
माजलगाव (प्रतिनिधी) दि २० डिसेंबर २०२४ रोजी श्री मंगलनाथ मल्टीस्टेट चे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. संस्थेचे श्रद्धास्थान लिंगैक्य प्रभू पंडिताराध्याय शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून माजलगाव मिस्कीन स्वामी मठ संस्थान चे मठाधीपती श्री.ष.ब.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते दिनदर्शिका २०२५ चे लोक प्रकाशन करण्यात आले…
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री आर.जी कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत सभासदांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती व्हावी व दिनदर्शिकेचा देखील लाभ सभासदांना घेता यावा करीता संस्था गेली २५ वर्षांपासून अखंडित परंपरागत दिनदर्शिकेचे प्रकाशन करत आहे. त्याच बरोबर सर्व सभासदांना सदरील दिनदर्शिका घरपोच दिली जाणार आहे. संस्थेचे श्रद्धास्थान लिंगैक्य प्रभू पंडिताराध्याय शिवाचार्य महाराज यांनी वचन,निष्ठा व समाजसेवा या घालून दिलेल्या तीन बंधननावरती संस्था कार्य करत असल्यामुळे संस्थेला आज यशस्वी २५ वर्ष पूर्ण झाली. त्यांचा आशीवार्द संस्थेच्या सदैव पाठीशी आहे.
संस्थेचे आज रोजी ५५० कोटी पेक्षा अधिक व्यवसाय असून ३११ कोटी ठेवी व २३२ कोटी पेक्षा अधिक कर्ज वाटप आहे त्यामध्ये १२५ कोटी पेक्षा अधिक सुरक्षित सोनेतारण कर्ज वाटप आहे व एकूण कर्जाच्या ९९.०८ टक्के कर्ज हे सुरक्षित असल्यामुळे सभासदांच्या ठेवी या सुरक्षित आहेत.
संस्थेने स्थापनेपासून केवळ व्यवसाय वाढ व अधिकाधिक नफा मिळवणे हे उद्धिष्ट न ठेवता सभासद सेवा व सभासदांच्या ठेवीना सुरक्षितता या बाबींना नेहमीच प्राधान्य दिले आहे यापुढे देखील संस्था सुरक्षिततेला प्राध्यान्य देऊनच काम करणार आहे असे आश्वासन दिले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री सुधाकर गुळवे,व्यवस्थापकीय संचालक
अँड.रवींद्र कानडे संस्थेचे मुख्य सरव्यवस्थापक श्री भिसे दत्तात्रय,श्री नारायण शेंडगे, व वरिष्ठ अधिकारी श्री सचिन कैलासे,राहुल काटकर,अमोल पांडे, विकास पाटील इत्यादी उपस्थित होते…