16.4 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

ड्रोन खरेदी अर्थसहाय्य योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

ड्रोन खरेदी अर्थसहाय्य योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष साळवे यांचे आवाहन.

बीड, दि. 17  :- कृषी क्षेत्रात ड्रोन (मानव विरहीत वायू यान) च्या वापरास पुरेश्या संधी असून सद्य स्थितीत त्याचा विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटक नाशके, सूक्ष्म मुलद्रव्ये, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडीत इतर कामासाठी देखील वापर करता येऊ शकतो. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजने अंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

सन 2024-25 साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी 100 ड्रोनचा महाराष्ट्र राज्य साठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला असून त्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येतो.

शेतकरी/संस्था/कंपनी/पदवीधर अनुदान मर्यादा शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था इ. 40 टक्के अनुदान रक्कम 4.00 लाख मार्गदर्शक सूचनेनुसार किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्य याची जी मूळ/वास्तविक किंमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान रक्कम देय राहील.कृषी व तत्सम पदवीधर 50टक्के अनुदान रक्कम 5.00 लाख अ.जा./अ.ज/लहान व सिमांतिक/महिला शेतकरी 50 टक्के अनुदान रक्कम 5.00 लाख सर्वसाधारण शेतकरी 40 टक्के अनुदान रक्कम 4.00 लाख आयुक्त, कृषी यांचे निर्देशान्वये ड्रोन या घटकासाठी ऑफलाईन अर्ज न करता इतर औजारांप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करून अर्ज करावेत.

कृषि यांत्रिकीकराण – मुख्य घटक – भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र या घटकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.त्यामुळे सन 2024-24 मध्ये ड्रोन हा घटक ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्यामुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.ov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष साळवे, , बीड यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!