परभणी येथील भारतीय संविधानाच्या विटंबनेचा जाहीर निषेध; कॉम्बिन ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावे: वंचित बहुजन आघाडी माजलगाव
माजलगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधान हे या देशातल्या तळागाळातील शेवटच्या वंचित माणसाला न्याय देण्यासाठी सक्षम आहे. प्रत्येक समाजातल्या वंचित समाजाला सन्मानाने स्वाभिमानाने व स्वतंत्र जपता यावे .समता स्वातंत्र्य बंधुत्व या देशांमध्ये नांदावी व शेकडो जाती, अनेक धर्म अनेक बोलीभाषा प्रतिक राज्याच्या वेगळेपणा या सर्वांना एकत्रित ठेवण्याची जादू फक्त आणि फक्त याच संविधानामध्ये आहे अशा या संविधानाची विटंबना काही देशद्रोहींनी परभणी या ठिकाणी केली आहे अशा व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या पाठीमागचा सूत्रधार शोधण्यात यावा घटना घडवून गेल्याच्या नंतर परभणी शहराच्या जाणीवपूर्वक आंबेडकरी वस्ती वस्ती मध्ये अटक सूत्र चालू आहे ते तात्काळ सामन्यात यावे वरील घटनेचा माजलगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे यावेळी निवेदनावर भारत तांगडे अंकुश जाधव धम्मानंद साळवे, राजरत्न खळगे, सुनिल जावळे, आमजद पठाण,प्रदीप साळवे, अशोक पौळ,सुहास बोराडे आमजद पठाण ,सुनील जावळे