यश प्राप्तीसाठी जिद्द आणि सातत्याची गरज – पो.नि. राहुल सुर्यतळ
सुंदराराव सोळंके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
माजलगाव (प्रतिनिधी )संविधानाने सर्वांना समान अधिकार दिल्याने उच्च पदप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना संधी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी भीती न बाळगता जिद्दीने व अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच प्राप्त होईल असे प्रतिपादन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन प्रसंगीमार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात सुंदर रत्न अकॅडमी च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. यावर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन पो.नि. राहुल सूर्यतळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.के. सानप होते तर उपप्राचार्य डॉ. एम. ए. कव्हळे, केंद्र संयोजक प्रा. बालाजी बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राहुल सूर्यतळ म्हणाले की आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. शिक्षणाची संधी आहे. त्याचे सोने करा आणि उज्वल भविष्य घडवा. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर शरीर संपत्ती जपावी.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जी. के. सानप म्हणाले की, महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा निश्चित एक ध्येय ठेवून वाटचाल करावी तरच यश प्राप्त होईल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बालाजी बोडके यांनी केले सूत्रसंचालन कु. दिपाली शेजुळ हिने केले तर कु.गायत्री दाभाडे हिने आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.सुरेश देशमुख,प्रा ज्ञानेश्वर शिंदे, प्रा.सुदर्शन स्वामी, प्रा.उमेश राठोड, प्रा संजय बागुल,प्रा सिद्धेश्वर कदम, प्रा एकनाथ शेंडगे,प्रा संग्राम सोळंके, प्रा.इम्रान पठाण यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती .