घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्या गॅरेज वर पोलिसांचा छापा.
एक चारचाकी वाहन, सहा भारत गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटर, असा एक लाख चवऱ्या हत्तर हजारांचा मुदे माल पोलीसा कडून जप्त.
माजलगाव ( प्रतिनिधी) आज दि. 19 शनिवार रोजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल सूर्यतळ यांच्या टीमने गोपनिय माहीतीच्या आधारे माजलगांव शहरातील बायपास रोड लगत असलेल्या मुंबाजा मोटार गॅरेज नावाच्या दुकानामध्ये 12.05 वा. छापा टाकुन तेथे घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेला भारत गॅस (स्फोटक पदार्थ) धोकादायकरीत्या भरण्यात येत होता.लोकांचे जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वाहनामध्ये निष्काळजीपणे भरत असतांना तीन लोकांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील एक ओमीनी वाहन, 06 भारत गैस कंपनीचे गॅस सिलींडर, गॅस भरण्यासाठी वापरात येणाऱ्या दोन इलेक्ट्रीक मोटार असा एकुण 1,74,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असुन एकुण 05 आरोपीतांविरुध्द गु.र.नं. 418/2024 कलम 287,288 भारतीय न्याय संहीता सन 2023 सह कलम 3/7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम सन 1955 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माकने,. हेड कॉन्स्टेबल तोटेवाड , पोलीस कॉन्स्टेबल श्री पवार, श्री थापटे श्री, हेड कॉन्स्टेबल गायकवाड. यांनी कारवाई केली.