19.6 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

काळा पैसा वापरला जात असल्यास माहिती देण्याचे आवाहन

काळा पैसा वापरला जात असल्यास माहिती देण्याचे आवाहन

बीड दि. 16  : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती असल्यास ती नि:संकोचपणे द्यावी, असे आवाहन नागपूरच्या आयकर प्रधान संचालक कार्यालयाचे आयकर उपसंचालक (तपास) अनिल खडसे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

माहिती पाठविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0355, 1800-233-0356, छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हाटसअप क्र. 9403390980, इमेल nagpur.addldit.inv@incometax.gov.in, nashik.addldit.inv@incometax.gov.in आहेत. निवडणुकी दरम्यान काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागास सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!