15.6 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मीच उमेदवार!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मीच उमेदवार!

मी कोणाची शिफारस केली नाही; .माजी आ.राधाकृष्ण होके पाटील.

माजलगाव दि.१६( प्रतिनिधी) विधानसभेच्या मैदानात उतारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमची प्रबळ दावेदारी आहे.पवार साहेबांच्या आशीर्वाद मिळाल्यास मीच उमेदवार राहणार आहे.असा आत्मविश्वास माजी आ.राधाकृष्ण होके पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान इतर कोणाच्या उमेदवारीची शिफारस मी पक्षाकडं केली नाही,असी माहितीही त्यांनी यावेळी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्राकाद्वारे त्यांनी सांगितले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभागल्या नंतर आम्ही पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.इतर कोणात्याही गटाच्या प्रलोभाला बळी न पडता शरदचंद्रजी पवार यांच्या अडचणीच्या काळातही मी सक्षमपणे पक्षासोबत उभा राहिलो. मागच्या 35 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.पवार साहेबांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एक वेळेस लोकसभेला व दोन व वेळेस विधानसभेला निवडणुकीत उभा करून विश्वास टाकला.1990 ते 1995 दरम्यान आमदार म्हणून काम केले. मतदारसंघात गाव पातळीवर माझा संपर्क आहे.सर्व जाती धर्मात मानणारा वर्ग आहे.पवार साहेबांच्या अडचणीच्या काळातही साथ सोडली नाही.पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यात कार्यकर्ता म्हणून कष्ट घेतले आहे.संपूर्ण मतदारसंघात गाव पातळीवर आमचा कायम संपर्क आहे.या शिदोरीवर येत्या विधान सभेच्या मैदानात आम्ही उतरणार आहोत.त्यामुळे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीच उमेदवार असणार!असा विश्वास मला आहे.पक्षप्रमुख पवार यांनी मला उमेदवारी देऊन आशीर्वाद दिल्यास जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मीच आमदार होणार असल्याचा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला.दरम्यान पक्षाकडं इतर कोणाच्या उमेदवारीची आपण शिफारस केली नसल्याचे त्यांनी सांगून,पक्ष देईल त्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार असल्याची कबुली त्यांनी यावेळी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!