राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा माजलगावचा दबदबा
पैलवान सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी
माजलगाव :(प्रतिनिधी ): महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२४-२५ (१९ वर्षाखालील – फ्रीस्टाईल) ता. १४/१५ ऑक्टोंबर २०२४ रोजी बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी, जि. अहमदनगर येथे पार पडल्या. छत्रपती संभाजी नगर विभागातून ७० किलो वजन गटातून आलेला पै. सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर याने ३ राऊंड खेळून फाइनल कुस्ती १०-० अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवत राज्यात पुन्हा एकदा कुस्ती प्रकारात माजलगाव चा दबदबा कायम ठेवत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.पैलवान सुमितकुमार सध्या माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात शिकत असून, रुस्तुम ए हिंद पै. अमोल बुचूडे कुस्ती केंद्र पुणे येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला पै. सुमीतकुमार याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून उत्तरप्रदेश मेरठ येथे होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच महारष्ट्राला या राष्ट्रीय स्पर्धेत सुमितकुमार राज्याला सुवर्णपदक मिळून देणार का, याकडे आत्ता सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच, या अभूतपूर्व यशाबदद्दल पै. सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर याने सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राचार्य,क्रीडा विभागाचे प्राध्यापक श्री आवारे सर, पुणे येथील प्रशिक्षक, वस्ताद व आई वडील यांच्यासह तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसह जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.