माजलगाव येथील नित्य नियमाने काम करणाऱ्या मल्टीस्टेट ताठ मानेने उभ्या.
नोट बंदी, घोटाळे, अफवा, असे अनेक वादळे आले, मात्र मल्टीस्टेट डगमगल्या नाहीत.
माजलगाव ( प्रतिनिधी) आर्थिक संस्था चालवणे म्हणजे काचेचे भांडे आहेः. कधी तडा जाईल याचा भरवसा राहिला नाही. जिल्हयात अनेक मल्टीस्टेट संचालका कडून अनित्य नियमाने व्यवहार झाल्यामुळे वितिय संस्था बुडल्या असल्याचे चित्र सर्वश्रुत आहे. यामुळें एका मल्टीस्टेटला गेलेला तडा हा सर्वत्र ठेवीच्या स्वरूपात सर्वांना सर्व बहुत बसतो. मात्र याचा परिणाम आपल्या मल्टीस्टेट वर होऊ नये म्हणून माजलगाव तालुक्यातील अनेक हुशार तज्ज्ञ संचालकांनी नित्य नियमाने आर्थिक व्यवहार ठेवला आहे. यामुळें विश्वाची मजबूत भिंत निर्माण केल्यामुळे किती ही भुकंप, वादळे आले तरी त्यापासून आपण वाचू शकतो एवढे अतूट विश्वाचे नाते येथील संचालकांनी ग्राहाकां सोबत निर्माण केलें आहेत.
नोट बंदी, मुळे अनेक अनित्य व्यवहार करणाऱ्या मल्टीस्टेट अचानक आलेल्या वादळात उडून गेल्या, त्याच बरोबर अनेक खातेदारांच्या दिवाळ काढून गेल्या यात अनेक वयोद्ध लोकं हाय.. करुन मरुन गेले. हा प्रकार येथील अनेक मल्टीस्टेट संचालक यांच्या डोळ्या समोर घडला. मात्र याला जबाबदार अनित्य व्यवहार करणारे संचालक आहेत. हे एका सोबत घडले ते आपल्या सोबत घडू नये, म्हणून तालुक्यातील अनेक मल्टीस्टेट आपला आर्थिक व्यवहार हा नित्य नियमाने ठेवून लोकांना आर्थिक सुविधा कर्ज व ठेवी रुपात देत आहेत. यामुळें किती ही वादळे आले तरी माजलगाव येथील मल्टीस्टेट ताठ मानेने उभ्या आहेत.
मल्टीस्टेटचे महत्व खूप आहेः यां आर्थिक संस्थेतून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, कर्मचारी, यांना वेळेवर वित पुरवठा करणारी खाजगी वितीय संस्था म्हणून बघितले जाते. तालुक्यात अनेक जणांना कर्ज देऊन व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली आहे. यामुळे सावकारा कडे जाण्याची वेळ यां मल्टीस्टेट मुळे बंद झाली आहे. सावकारी आणि मल्टिस्टेट यांच्यात आर्थिक व्यवहारात खूप मोठा फरक आहे. जर खातेदारांनी कर्ज थकवले तरच सावकारी सारखे कर्ज पडते, पण नियमित कर्ज फेडत राहिले तर हे कर्ज सुलफ पडते. यामुळें योग्य वेळेत परत फेड करण्याची सवय लागणे आवश्यक आहे.
जिल्हयात घोटाळे अनेक बाहेर आले. मात्र याचा तडा बसण्या अगोदरच तज्ञ संचालकांनी आपला प्रामाणिक व्यवहार, आणि ग्राहकांच्या विश्वाची भिंत मजबूत बांधून ठेवली होती. यामुळें किती ही आर्थिक घोटाळ्याचे वादळे भूकंप आले तरी ताढ मानाने माजलगाव येथील ठराविक मल्टीस्टेट उभ्या आहेत. याचा ग्राहकांना अभिमान असल्याचे सध्या बोलले जात आहे.