बिबट्यांनी पाडला हरणाचा फडशा सावरगाव शिवारातील घटना.
सावरगाव शिवारात अनेक जनावरांचा गेला जीव, शेतकरी भयभीत.
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावरगाव शिवारात काल रात्री बिबट्यांनी हरणाचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. हि घटना माजलगाव धरणाच्या जमीन शेत्रात घडली असून शेतकरी भयभीत झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी सावरगाव शिवारा सह अनेक ठिकाणीं बिबट्यांनी जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या होत्या. परत अनेक दिवसा नंतर बिबट्यांनी हरणाची शिकार केल्याची घटना रात्री माजलगाव धरण शेत्रात घडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
यामुळें परिसरातील शेतकरी भयभीत झाला असुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व डॉ उध्दव नाईकनवरे यांनी वन विभागाकडे केली आहे.