जायकवाडी धरण नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा*
जायकवाडी प्रकल्प 94.5% क्षमतेने भरले
बीड, दि.7 : जायकवाडी धरण नियंत्रण कक्ष, पैठण यांच्याकडून पावसामुळे सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.आज दि. 07-09-2024 रोजी सायंकाळी ठिक 18.00 वा.(सहा वाजता) जायकवाडी प्रकल्प 94.5% क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघुन पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.
तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात व नदीकाठावर जाऊ नये. कुठलीही जीवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
00000