21.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहा – पॅंथर नितीन सोनवणे

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहा – पॅंथर नितीन सोनवणे

बीड (प्रतिनिधी) – राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे व ऍड.अविनाश गंडले यांच्या हस्ते ऑल इंडिया पँथर सेनेच्या बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दिनांक 09/09/2024 ठिक 2 वाजता शिवराज पान सेंटर समोर बडगे बापू बिल्डिंगच्या खाली जगताप कॉम्प्लेक्स येथे संपन्न होणार आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून दलित शोषित पीडित आदिवासी मुस्लिम बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी देशात अस्तित्वात असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आंदोलनात्मक पवित्र घेऊन जनसामान्यांचे जन आंदोलन उभा करण्यासाठी दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती सारखी परिस्थिती असून दलित अत्याचार विरोधात आवाज उठवण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून होत आहे.
जातीयता ही कोरोनापेक्षा भयानक व्हायरस आहे हा व्हायरस नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

तरी बीड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, टिपू सुलतान यांच्या विचारावर चालणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव यांनी उपस्थित राहावे.असे आव्हान ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!