महिला, विदयार्थी व नागरिकांच्या सुरक्षाच्या दृष्टिकोनातून तेलगाव येथे पोलिस चौकी सुरू करा: बाळासाहेब सोनटक्के
सत्यशोधक ओबीसी परिषदेची पोलिस अधीक्षका कडे मागणी.
बीड (प्रतिनिधी) .धारुर तालुक्यातील तेलगाव हे मोठ्या बाजार पेठाचे गावं आहे वडवणी. धारुर.माजलगाव.परळी या चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असुन या गावची लोकसंख्या 10 हजारांच्या जवळपास आहे.या ठिकाणी परिसरातिल 25 ते 30 गावांचा सतत संपर्क असतो तेलगाव येथे अनेक शाळा महाविद्यालये.विविध शासकीय व खाजगी बँका.अनेक विभागाचे शासकिय कार्यालये.छोटे मोठें व्यवसाय व साखर कारखाना असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या विध्यार्थी व नागरीकांची मोठी वर्दळ असते.या वर्दळी मुळे वाहनाची मोठ्या.प्रमानात रेलचेल होते.तसेच या ठिकाणी एस.टि.स्टॅड असुन लांब अंतरावरुन येणाऱ्या बस थांबण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.त्यामुळेही प्रवाशांची मोठी गर्दी असते.अशा महत्वाच्या ठिकाणी रहदारीचे व नागरीकांच्या वर्दळीमुळे सतत चोऱ्या.भांडण तसे . विद्यार्थ्यांची छेडछाड.महिलाची छेडछाड.अपघाताचे प्रमाण वाढले आहे.या परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे सतत सामाजिक व राजकीय वैमनस्यातुन भांडणं तंटे होत आहेत.विध्याथी व महिलांना असुरक्षित वाटत आहे.अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.अशा प्रकारामुळे दिंदुड पोलीस कर्मचाऱ्यांवर खुप मोठा ताण पडत आहे.अशा प्रकाराला आळा घालायचा असेल तर तेलगाव येथे पोलिस चौकी सुरु करुन वरिष्ठ दर्जाचे अधिकारी या ठिकाणी असणे गरर्जेचे आहे.नागरिका.महिलानां.विद्यार्थाना सुरक्षा महत्त्वाची आहे.माञ अशा गैरप्रकारा मुळें तेलगाव येथे बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची नकारात्मक भावना होतं आहे त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या बाबींचा विचार करून पोलिस चौकी सुरु करावी अशी मागणी . सत्यशोधक ओबीसी परिषदेचे धारुर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक यांच्या कडे मागणी केली आहे