अतिरिक्त पावसामुळे गंगामसला येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान, आर्थिक भरपाई देण्याची मागणी.
कर्ज काढून पिकांना जीवदान देणारे शेतकरी अतिरिक्त पावसामुळे देशोधडीला
.
पिकांचे अतोनात नुकसान, वेळीच मदत करण्याची मागणी.
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगामसला येथील शेतकरी विठ्ल सोळंके यांच्या शेतात अतिरिक्त पावसाच्या पाण्यामुळे शेतातील सोयाबीन कापुस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.गत आठवडयात चोहीकडे पाऊस दमदार पडल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, कापूस पिकांनी माना टाकल्या आहेत. तर काही पिके वाहून गेले आहेत. जोरदार मुसळधार पावसामुळे शेतात मोठ मोठे वळण निर्माण झाले आहे. यात शेतीचे नुकसान झाले आहे. यात अनेक सपाट जमिनीचा समतोल बिघडला आहे.शेतकऱ्यांनी पिकांची मशागत व्यवस्थित होवि यां करिता खाजगी वितीय संस्था यांच्या कडून कर्ज घेतले. पिकांच्या जीवावर कर्ज फेडणे होईल या आशेने कर्ज काढले गेले मात्र पूर्ण पीके हाता तोंडाशी आलेले, हातचें गेल्या मुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
गंगामसला येथील शेतकरी विठ्ल सोळंके यांच्या शेतात पूर्ण पावसाचे पाणीच पाणी झाल्यामुळे जमिनी बरोबर, पिके देखील वाहून गेले आहेत. यामुळें शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांची आर्त हाक सरकारनी एकुण त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गंगामसाला येथील शेतकरी विठ्ठल सोळंके यांनी केली आहे.