गुरुकृपा इन्स्टिट्यूटमध्ये राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा
मराठवाड्यातील फार्मसी कॉलेजच्या १२५ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
माजलगाव, ता. ५ (बातमीदार) : येथील गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गुरुवारी (ता. पाच) पाचवी राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मराठवाड्यातील डी. आणि बी. फार्मसी महाविद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा घेणारी गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हि एकमेव संस्था आहे.
माजलगाव येथील गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (ता. पाच) संपन्न झाला. यावेळी गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यशवंत राजेभोसले, नांदेड विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. कल्याणकर, प. पु. गुरु माउली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद विद्यालयाच्या विभागप्रमुख संगीता देशमुख, पत्रकार सुभाष नाकलगावकर, पांडुरंग उगले, हनुमान कासट, प्राचार्य अमित बिंदू आदी उपस्थित होते. या स्पर्धेत बी. फार्मसी गटातून प्रथम परमेश्वर मुंडे (दयानंद कॉलेज, लातूर) द्वितीय ऋषिकेश मोहाले, पंढरीनाथ केदार (आदित्य कॉलेज, बीड) तर, तृतीय पारितोषिक तृप्ती पोपळे (सरस्वती कॉलेज, हिंगोली) डी. फार्मसी गटातून प्रथम अनुजा भावसार, गायत्री भोसले (दयानंद कॉलेज, लातूर) द्वितीय सय्यद तरवीन अनिस, ज्ञानेश्वरी डाके (गुरुकृपा इन्स्टिट्यूट, माजलगाव) तृतीय पारितोषिक सानिका पवार, ऋतुजा राजमाने (चन्नाबसवेश्वर कॉलेज, लातूर) आयुर्वेद पद्वित्युर पदवी गटातून प्रथम पारितोषिक डॉ. श्रीकांत राजमाने (गडहिंग्लज कॉलेज, कोल्हापूर) तर, आयुर्वेद पदवी गटातून प्रथम दिपाली पतंगे, शैलेजा कोडेवाड (प.पु. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद कॉलेज, माजलगाव) द्वितीय विष्णू झरकर, अनिता काकडे (आदित्य आयुर्वेद कॉलेज, बीड), तृतीय असिफ शेख, शेख नदीम (प.पु. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद कॉलेज, माजलगाव) या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले, विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा घेणारी एकमेव संस्था असलेल्या गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यावेळी कौतुक केले.
——————–