अखिल भारतीय पाचवी बौध्द धम्मपरीषदे निमित्त नियोजन बैठकीचे आयोजन
बीड(प्रतिनिधी) – प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड व बीड येथील समस्त बौद्ध उपासक व उपासीका यांच्या संयुक्त विद्यमानाने बीड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 69 व्या धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने पाचवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे.
नियोजीत बौद्ध धम्म परिषदेच्या पुर्व तयारीसाठी व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे रविवार दि. 08 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:00 वाजता पु. भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो -पुर्णा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक आयोजीत करण्यात आले आहे.
याबैठकीस प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड व सर्व शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील संघ, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि बीड येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे समस्त बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक व धार्मीक चळवळीत सक्रिय असणाऱ्या सर्वच मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभणार आहे. तरी आपण या बैठकीत सहभागी होऊन धम्म चळवळीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड व बीड येथील समस्त बौद्ध उपासक व उपासीका यांनी केले आहे.