16.4 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी स्कॉच चा पुरस्कार जाहीर. तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या कार्याचा गौरव

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी स्कॉच चा पुरस्कार जाहीर.

तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या कार्याचा गौरव

बीड, दि. 5 बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते.त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणुन स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्हयाची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा 22 सप्टेंबर 2024 रोजी राजधानी नवी दिल्ली येथे 99 व्या स्कॉच परिषदेनिमित्त आयोजित एका सोहळयात प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार सध्या पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे या हा पुरस्कार स्वीकारतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!