कापूस पिकामधील अकस्मिक मर रोगामुळे शेतकरी चिंतेत हेक्टरी लाख रुपये नुकसान भरपाई द्या :-राम कटारे
- अतिवृष्टी झाल्याने पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी मोठ्या संकटात.
माजलगाव (प्रतिनीधी) तालुक्यासह हारकी निमगाव परिसरात गेल्या आठवड्या पासून झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसून येत आहे,शेतातील कापूस सोयाबीन या पिकासह इतरही पिकावर अतिवृष्टी,मुसळधार पावसामुळे अत्यंत वाईट परिणाम होताना पाहून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे व या अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
अतिवृष्टी,मुसळधार पाऊस सातत्याने पडल्यामुळे कापूस पिकातील आकस्मिक मर मोठ्या प्रमाणात झाल्याने पूर्ण कापूस नष्ट होत आहे या आकस्मिक मर झाल्याने सर्व कापसाचे पीक हातातून जाताना शेतकऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसून येत आहे सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने कापूस,सोयाबीन या पिकासहित इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर खत,औषध यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे कापूस हे पीक नगदी पीक असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या पिकावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे परंतु गेल्या आठवड्या भरावापासून सातत्याने पडत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे सर्व कापूस पीक नष्ट झाले आहे व त्यातच पिकातील आकस्मिक मर झाल्याने शेतकऱ्याचे नगदी पीक पूर्ण हातातून जात असल्याने शेतकरी भयभीत झालेले आहेत यावर कोणताच उपाय आता शेतकऱ्याकडे राहिलेला नाही शेतकरी वर्गापुढे मोठा पेज,मोठे संकट समोर आलेले आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लाखो रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी असे आव्हान सर्व प्रगतशील शेतकरी राम कटारे सह शेतकरी बांधव यांच्या वतीने प्रशासनाला केली आहे.