अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी : विलास साळवे
माजलगाव दि.४( प्रतिनिधी) गेल्या तीन चार दिवसापासून बीड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केसापुरीचे माजी सरपंच विलासराव साळवे यांनी केली आहे बऱ्याच वर्षानंतर यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागाव मोलाचे बियाणे खते घेऊन वेळेवर पेरणी केली आहे
आणि वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन कापूस तुर ऊस आधी पिकेपिके ही जोरात आली होती परंतु गेल्या तीन चार दिवसापासून बीड जिल्ह्यात धुवाधार अतिवृष्टी झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घाशीतोंडी आलेला घास या निसर्गाने हिरावून नेला आहे व शेतकऱ्यांचे प्रचंड पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना या पिकांची नुकसान भरपाई म्हणून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केसापुरीचे सरपंच विलासराव साळवे यांनी केले आहे