वसंतराव नायक चौक व गोरसेना शाखेचे येथे लवुल नं 1 येथे उद्घाटन संपन्न .
माजलगाव (प्रतिनिधी) गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नायक चौक व गोरसेना शाखा उद्घाटन सोहळा चाहूर तांडा लवूळ क्र.1 ता माजलगाव येथे जोरदार पाऊस चालू असताना देखील सर्व लोकांनी प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना व प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण जिल्हा सचिव गोरसेना
तालुक्यातील पदाधिकारी शेषराव पवार सर अजित चव्हाण रमेश पवार श्रीराम चव्हाण संतोष चव्हाण रमेश राठोड बाळू पवार एकनाथ राठोड व परिसरातील मित्रपरिवार व शाखेवरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक तालुका संघटक प्रकाश चव्हाण यांनी केले
यावेळी प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी या महाराष्ट्र राज्यावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे वसंतराव नायक साहेब यांच्या प्रतिमेला वंदन करून नायक साहेबांचे कार्य कार्यकर्त्यांना पटवुन दले 1913 ते 1979 या कालावधीमध्ये नायक साहेबांनी 66 वर्षा मध्ये 33 वर्ष सत्तेवर राहिले सुरुवातीला 1946 ला वसंतराव नायक साहेब पुसद येथे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर 1962 मध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाची त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली असा वसंतराव नायक साहेबांचा कार्यकाळ होता गोर बंजारा समाज शिक्षणापासून वंचित असल्यामुळे जास्तीत जास्त आश्रम शाळा देण्याचे कार्य नायक साहेबांनी केले त्याचबरोबर पाणी आडवा पाणी जिरवा या महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती या महाराष्ट्राला सुजलाम सुजलाम करण्याचे काम वसंतराव नायक साहेबांनी केले ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस शनिवार वाड्यामध्ये वसंतराव नायक साहेबांनी सांगितले होते दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नायक या शनिवार वाड्यामध्ये फाशी घेईन असा नेता होणे पुन्हा शक्य नाही असे प्राध्यापक संदेश भाऊ यांनी तांड्यातील व शाखेवरील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले