10.6 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रद्धा,शील,दान व प्रज्ञेशिवाय कोणीही उपासक होऊ शकत नाही. – भिक्खू धम्मशील थेरो

श्रद्धा,शील,दान व प्रज्ञेशिवाय कोणीही उपासक होऊ शकत नाही. – भिक्खू धम्मशील थेरो

माजलगाव ( प्रतिनिधी)  धम्मात सफलता प्राप्त करण्यासाठी सद् गुणाची आवश्यकता असते, त्यासाठी उपासकांना चार सद्गुण आवश्यक असतात.ते म्हणजे श्रद्धा, शील, दान आणि प्रज्ञा.प्रज्ञा म्हणजे शहाणपण, ते म्हणजे सत्य असत्यातील फरक जाणने, अनित्य, अनात्म, दुःखाचा बोध होणे तसेच आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे होय.
श्रद्धेला शहाणपणाची म्हणजेच प्रज्ञेची जोड हवी असते.
उपासकाने दान कुणास द्यावे, कसे द्यावे यासाठी प्रज्ञेची गरज असते.
प्रज्ञा तीन प्रकारची असते

१) इतरांचे ऐकून मिळते ती “श्रुतमय प्रज्ञा’

2) चिंतनातून मिळते ती “चिंतनमय प्रज्ञा’

३) प्रत्यक्ष अनुभवातून मिळते ती “भावनामय प्रज्ञा”
पण मनुष्याला प्रज्ञा ही प्रत्यक्ष अनुभवातूनच येते.


उपासकाला दान देताना सहा गोष्टीचे स्मरण हवे.

१)श्रद्धायुक्त अंतःकरणातून दान द्यावे.

२)दान विधीपूर्वक द्यावे दोन्ही हाताने गुडघ्यावर बसून विनम्रतेने निस्वार्थपणे परतफेडीची अपेक्षा न करता द्यावे.
३)एकाग्रचित्ताने जागृतीपूर्वक दान द्यावे.

४)द्वेषभावना विरहित मैत्रीयुक्त चित्ताने दान द्यावे.

५)अहंकार विरहित दान द्यावे.

६) लोभविरहित भावनेने, निरपेक्ष भावनेने दान द्यावे.

या चारही सद् गुणा शिवाय मनुष्याला सुख नाही निर्वाण नाही तसेच जीवन सार्थकी लागत नाही. श्रद्धा, शील, दान, व प्रज्ञेशिवाय खरा उपासक होऊ शकत नाही. असे प्रतिपादन पू.भिक्खू धम्मशील थेरो यांनी श्रावस्ती बुद्ध विहार माजलगाव येथे केले. यावेळी पू.भिक्खू धम्मशील थेरो हे उपासकाचे चार सद् गुण या विषयावर बोलत होते.यावेळी रणजीत घनघाव व अनुपमा रणजीत घनघाव यांनी खिरदान दिले.
यावेळी प्रस्ताविक सदधम्म सेवा संघाचे जी एन घनघाव यांनी केले तर, सूत्रसंचालन ॲड.दशरथ मकसरे, यांनी केले.तर आभार सदाशिव भालेराव यांनी मानले.तसेच संस्थेचे पांडुरंग जाधव, एन.जी.शिनगारे, सोपानराव उजगरे, भगवानराव सातपुते, रविकांत उघडे, लिलाबाई उजगरे, धम्मपाल जावळे,विजय होळकट्टी हे उपस्थित होते. हिंगोली येथील शकुंतलाताई भूक्तार, पार्वतीताई श्रीखंडे, माजी प.स.सभापती संजीवनी पौळ, प्रकाश सोनकांबळे,भारत घनगाव, प्रतिभा वाघमारे,बन्सी शिरसट,तात्यासाहेब साळवे, वंदनाताई भालेराव,नितीन डोंगरे आदी. उपासक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!