6.3 C
New York
Friday, April 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्यात असा झाला पाऊस….

संततधार पावसाने ओलांडली जिल्ह्याची.सरासरी

2023 मध्ये याच दिनांकास  होता केवळ 47 टक्के पाऊस.

बीड दि. 2 :- या वर्षाच्या जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान पावसाळी सरासरीने जिल्ह्याची 655.5 इतकी सरासरी गाठली असून वार्षिक सरासरीच्या 115 टक्के पावसाची नोंद पहिल्या तीन महिन्यात झाली आहे गतवर्षी हाच पाऊस या दिनांकास केवळ 47.7 टक्के इतका होता.यंदाच्या हंगामात पाऊस चांगला राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता त्यानुसार जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी ओलांडली गेली आहे व मुबलक प्रमाणात पावसाची नोंद सर्व ठिकाणी झाली आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर ची वार्षिक सरासरी 566.1 मिमी. इतकी असताना यंदा 1जून 2024 पासून आतापर्यंत 655. 5 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय झालेल्या पावसाची टक्केवारी खालील प्रमाणे आहे बीड जिल्हा एकूण सरासरी 566.1 मिलिमीटर प्रत्यक्ष झालेला पाऊस 655.5 मिलिमीटर.

बीड तालुक्यात जून ते सप्टेंबर सरासरी 594.5 प्रत्यक्षात झालेला पाऊस 664.2 मिलिमीटर टक्केवारी 111.9, पाटोदा तालुक्यात 538.7 प्रत्यक्षात झालेला पाऊस 747.9 टक्केवारी 138.8,आष्टी तालुक्यात 546.1 प्रत्यक्षात झालेला पाऊस 601.7 टक्केवारी 110.2,आष्टी तालुक्यात 546.1 प्रत्यक्षात झालेला पाऊस 601.7 टक्केवारी 1102,गेवराई तालुक्यात 587 प्रत्यक्षात झालेला पाऊस 660.8 टक्केवारी 112.6,माजलगाव तालुक्यात 616.9 प्रत्यक्ष झालेला पाऊस 6080 टक्केवारी 110.2,अंबाजोगाई तालुक्यात 632.4 प्रत्यक्षात झालेला पाऊस 698 टक्केवारी 110.4,केज तालुक्यात 583.6 प्रत्यक्षात झालेला पाऊस 612 टक्केवारी 104.9,परळी वैजनाथ तालुक्यात 628.1 प्रत्यक्षात झालेला पाऊस 657.9 टक्केवारी 104.7,धारूर तालुक्यात 669.8 प्रत्यक्षात झालेला पाऊस 685.4 टक्केवारी 102.3,वडवणी तालुक्यात 60.7 प्रत्यक्षात झालेला पाऊस 627.3 टक्केवारी 104.4,शिरूर का.तालुक्यात 515.6 प्रत्यक्षात झालेला पाऊस 632.6 टक्केवारी 122.7

आज सकाळी प्राप्त नोंदीनुसार गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यामध्ये एकूण 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.
100 मिलिमीटर च्या वर एकूण 35 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.

सर्वात जास्त अतिवृष्टीची नोंद झालेले महसूल मंडळ,गेवराई तालुक्यातील रेवकी महसूल मंडळ 171.5mm,माजलगाव तालुक्यातील,गंगामसला महसूल मंडळ 171.0mm,परळी तालुक्यातील,सिरसाळा महसूल मंडळ 155.3 mm,धारुर तालुक्यातील,अंजनडोह महसूल मंडळ 108.8 mm,पैठण येथील जायकवाडी धरण 87 टक्क्याहून अधिक भरल्यानंतर यातून ताशी 500 दिवसात निसर्ग माजलगाव धरणासाठी सुरू करण्यात आलेला आहे. सदर पाणी जिल्ह्यात दाखल झाल्याचे शहागड येथील पुलावरून स्पष्ट निदर्शनास येत आहे.

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरला असून बीड शहरालगत बिंदुसरा नदी मधून दुथडी पाणी वाहताना दिसत आहे. पाण्याची आवक सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाऊस थांबताच शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी जारी केले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!