जि.प.प्रा.शाळेतील विदयार्थी गणवेश विना वंचित….
शिक्षक दिना पासून विद्यार्थ्यांच्या गणवेश बूट,सॉक्ससाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कास्ट्राईबचे बेमुदत धरणे आंदोलन!
माजलगाव (प्रतिनिधी)
दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू होताना किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींना गणवेश व बूट सॉक्स वितरण केले जाते परंतु यावर्षी ते अद्याप पावतो वितरित करण्यात आले नाहीत.तेव्हा ते 05 सप्टेंबर शिक्षक दिनापूर्वी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ते मिळावेत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येतील या आशयाचे निवेदन मा.गटशिक्षणाधिकारी यांना कास्ट्राइब महासंघाच्या वतीने देण्यात आल्याचे महासंघाचे ता.अध्यक्ष राहुल टाकणखार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की गावस्तरावर स्थापन झालेल्या इंग्लिश स्कूल शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना या सुविधा त्या प्रशासनातील लोकांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे गोरगरीब-वंचितांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,त्यांच्यामध्ये यामुळे न्यूनगंडाची भावना होताना दिसून येत आहे. व यामुळे पालक वर्गामध्ये देखील जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत असून,त्याचा परिणाम शाळेतील पटसंख्येवर पडत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने दि.05 सप्टेंबर 2024 पूर्वी विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा महासंघाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर दररोज शासकीय सुट्ट्या वगळता सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महासंघाचे जिल्हा मुख्य संघटक भारत टाकणखार सचिव अभिमन्यू इबिते जिल्हा उपाध्यक्ष वसंत टाकणखार राजकुमार सोनवणे कृष्णा हौसरमल किरण शिंदे निलेश गावडे नारायण भाळशंकर जीवन डोंगरे शिवाजी भाळशंकर किरण माने हनुमंत पांढरपोटे नागनाथ पडलवार प्रवीण जाधव राजेंद्र सातपुते राहुल खुणे नितीन पुटवाड बळीराम घनघाव गोविंद पवार अमोल राऊत अविनाश येळंबकर सय्यद आयुब शिवाजी व्यवहारे शंकर पवार सुमित घाडगे व शिक्षण विभाग प्रमुख रवी आदमाने विजय वैरागे आदींनी दिला आहे.