रोटरी क्लबचे कार्य प्रेरणादायी… प्रदीप निफाडकर..
(रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी चा पदग्रहण समारंभ संपन्न)
रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी व इनरव्हील क्लब ऑफ माजलगाव सिटी च्या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर व रोटरीचे प्रांतपाल माननीय डॉक्टर सुरेश साबू , सहाय्यक प्रांतपाल माननीय विवेक जी गंगणे यांच्या प्रमूख उपस्थितीत वैष्णवी मंगल कार्यालयात पार पडला…
रोटरीचे नूतन अध्यक्ष म्हणून रवींद्र कानडे व सचिव म्हणून सौ लता जोशी यांनी पदभार स्वीकारला तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष म्हणून सो प्राजक्ता गुंडेवार व सचिव म्हणून सौ स्मिता कानडे यांनी पदभार स्वीकारला.
मावळते अध्यक्ष रोटरियन राजेश देशपांडे व सचिव डॉ मधुकर घुबडे यांनी हा पदभार सुपूर्द केला.
क्लब चा कारभार अतिशय प्रेरणादायी असल्याचे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल रो डॉ सुरेश साबू यांनी व्यक्त केले रोटरीच्या The Rotary Foundation बद्दल माहिती दिली
प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी रोटरी च्या समाजाभिमुख कार्यक्रमांची प्रशंसा केली आणि आपल्या दिलखुलास गझलांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांनी सादर केलेल्या माझी मुलगी या गझलेने सर्वानाच अंतर्मुख केले
कार्यक्रमाची सुरुवात सुंदरश्या, ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’ या गीताने झाली रो डॉ स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर मावळते अध्यक्ष रो राजेश देशपांडे यांनी गत वर्षीचा क्लब चा आढावा मांडला अध्यक्ष रो रवींद्र कानडे यांनी सर्वांच्या सहकार्याने यावर्षी क्लब करणार असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली कवयत्री रो स्मिता लिंबगावकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलेल्या सूत्र संचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढली आभार सचिव रो लता जोशी यांनी मानले या कार्यक्रमासाठी माननीय राधाकृष्ण होकें पाटील, माननीय मोहनराव काका सोळंके, माननीय रमेश आडसकर माननीय नारायणराव डक ,माननीय ज्योतीताई डक,
मा सुरेंद्र रेदासणी, मा ॲड विश्वास जोशी , ॲड भानुदासरावजी डक, डॉक्टर सुरेश साबळे, डॉक्टर यशवंत राजेभोसले ,अमरनाथ जी खुर्पे ,माननीय प्रकाश दुगड यांच्या सह मोठ्या प्रमाणात माजलगाव व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी व इनरव्हील क्लबचे सर्व सदस्यांचे उपस्थिती होती.. पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने ,
पर्यावरण पूरक कापडी पिशवींचे वाटप करण्यात आले,
शिरूर येथील सर्पराज्ञी प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणेआणि सौ सृष्टी सोनवणे यांना भरीव आर्थिक मदत केली गेली तसेच, ग्रामीण भागातील शालेय मुलींसाठी पाच सायकलचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब चे मुखपत्र असणाऱ्या दृष्टीक्षेप या बुलेटीनचे प्रकाशन देखील करण्यात आले.. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून डॉक्टर स्वानंद कुलकर्णी यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट सदस्य सुरेश भानप साहेब , सहाय्यक प्रांतपाल डॉक्टर शंकर जुजगर,
गोविंद भाऊ बजाज, निरंजन वाघमारे, दिगंबर महाजन, डॉक्टर अर्चना पवार ,डॉक्टर अंजली अकोलकर यांच्यासह सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रगीतानंतर सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.