10.6 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार, आता 3 सप्टेंबरला काय होणार?

मुंबई: भारतीय इक्विटी इंडेक्स आज, 2 सप्टेंबर रोजी तेजीसह बंद झाले. निफ्टी आज 25,250च्या वर बंद झाला. बाजारातल्या तेजीमध्ये आयटी, एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्सचं सर्वाधिक योगदान होतं.

कामकाज सत्राच्या अखेरीला सेन्सेक्स 194.07 अंक म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 82,559.84 अंकांवर बंद झाला. निफ्टी 42.80 अंक म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 25,278.80 अंकांवर बंद झाला. आज जवळपास 1684 शेअर्समध्ये तेजी आली, 2191 शेअर्समध्ये घसरण झाली आणि 133 शेअर्समध्ये काही बदल झाला नाही. निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज ऑटो आणि हीरो मोटोकॉर्प या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी होती. ग्रासिम इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, अडानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया आणि नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण झाली.

बँक, एफएमसीजी आणि आयटी या व्यतिरिक्त सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले आहेत. त्यात कॅपिटल गुड्स, मेटल, हेल्थ सर्व्हिस, टेलिकॉम आणि मीडिया या क्षेत्रांमध्ये 0.4 ते 1.6 टक्के घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स सपाट बंद झाला. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्के घसरण नोंदवली गेली.

तीन सप्टेंबरला कशी असेल शेअर बाजाराची दिशा?

एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे यांच्या मते, सकारात्मक सुरुवातीनंतर निफ्टी आज ओपनिंग हाय पातळी पार करण्यात अयशस्वी ठरला. 25,300 स्ट्राइकवरही मोठं कॉल रायटिंग पाहायला मिळालं. एकंदर पाहता आज पूर्ण दिवस पुट रायटर्सच्या तुलनेत कॉल रायटर्सची संख्या खूप जास्त होती. निफ्टी 25,300च्या खाली राहील तोपर्यंत नजीकच्या भविष्यात मार्केटचा ट्रेंड साइडवेजने नकारात्मक राहू शकतो. खालच्या पातळीवर निफ्टीसाठी 25,000ला सपोर्ट दिसतो आहे. तिथे खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळालं आहे.

शेअरखानचे जतिन गेडिया यांनी सांगितलं, की निफ्टी आज तेजीसह उघडला आणि 43 अंक वर हिरव्या रंगात बंद झाला. डेली चार्टवर निफ्टी सलग तेराव्या कामकाज सत्रात हिरव्या रंगात बंद झाला आहे. सेक्टोरल रोटेशन निफ्टीला उच्च पातळीवर टिकून राहायला मदत करत आहे. आज आयटी आणि एफएमसीजी इंडेक्सने निफ्टीला सर्वाधिक मदत केली.

बाजारात पुढेही तेजी कायम राहील अशी आशा आहे. निफ्टीमध्ये लवकरच आपल्याला 25,500ची पातळी पाहायला मिळू शकते. खालच्या बाजूला 25,210 – 25,120वर महत्त्वाचा सपोर्ट दिसत आहे. ट्रेलिंग स्टॉपलॉससह निफ्टीमध्ये तेजीच्या सौद्यांमध्ये टिकून राहायचा सल्ला असेल.

बँक निफ्टीमध्ये आज तेजीचे काही संकेत दिसले. इंडेक्समध्ये सर्वाधिक वेटेज असलेल्या शेअर्समध्ये कमजोरी पाहून त्याच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. पीएसयू बँक सेक्टरने पुन्हा तेजी पकडण्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही कामकाज सत्रांमध्ये ही तेजी कायम राहू शकते. बँक निफ्टीसाठी 51580 – 51700 वर तत्काळ रेझिस्टन्स आहे. 51000-50900 शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!