10.6 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘मुलगा गेला, पैसेही गेले’; मराठवाड्यातल्या पतसंस्थांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?

तो घरी यायचा. म्हणायचा, नाना, असं झालं तसं झालं. म्या म्हणलं, तू काहीच नको करू. आपण पाहून घेऊ काय करायचं ते. जात्येन नाहीतर येत्येन. पण तू काही राडा करू नको.

पण त्याने एक दिवस रात्रीला 6 वाजता आम्ही कुणी घरी नसतानाच राडा केला. आत्महत्या केली त्यानं.” – नारायण ईथ्थर, छत्रपती संभाजीनगर

“आता काय, आता सध्या ते सगळं बंद पडल्यामुळे मीच शांत झालोय. आता काय डोकं लागना, काय करावं म्हणून.” – संजय तिपाले, बीड

छत्रपती संभाजीनगरचे नारायण ईथ्थर आणि बीडचे संजय तिपाले ही पतसंस्थांमधील घोटाळ्याला बळी पडल्याची प्रातिनिधिक उदाहरणं. मराठवाड्यातल्या गावागावात तुम्हाला अशा करुण कहाण्या ऐकायला मिळतील.

मराठवाड्यात गावागावांमध्ये पतसंस्था आणि मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजचे कार्यालयं स्थापन झालेली दिसून येतात.

चांगला व्याजदर मिळतोय म्हणून गोरगरिबांसहित श्रीमंतांनीही या पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवले आणि आता त्यांचे पैसे अडकून पडलेत.

एकट्या मराठवड्यात सहकारी पतसंस्थांमध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली.

  • मराठवाड्यात सहकारी पतसंस्थांमध्ये हे घोटाळे कसे झाले?
  • या घोटाळ्याला बळी पडलेले आज कोणत्या अवस्थेत आहेत?
  • ठेवीदारांनी पतसंस्थेत पैसे ठेवताना काय काळजी घेतली पाहिजे?

या प्रश्नांची उत्तरं देणारा बीबीसी मराठीचा हा विशेष रिपोर्ट.

‘पैसे गेल्याचं दु:ख नाही, पण मुलगा नव्हता जायला पाहिजे’

65 वर्षांचे नारायण ईथ्थर यांना सध्या ऐकायला कमी येतं. मोठ्या आवाजात बोललं की, मग ते प्रश्नाला उत्तर देतात.

नारायण यांचा मुलगा रामेश्वर ईथ्थरनं छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत सर्व कुटुंबीयांचे मिळून 23.50 लाख रुपये गुंतवले. पतसंस्थेत घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर रामेश्वरने आत्महत्या केली.

त्या दिवशीचा घटनाक्रम आठवल्यावर नारायण यांच्या डोळ्यात पाणी येतं.

“12 जुलै 2023. ही घटना अशी झाली की, एमआयडीसीचे पैसे उरले होते. रामेश्वरची इच्छा होती व्याज-बिज व्यवस्थित देते तर तिथं (आदर्शमध्ये) पैसे टाकू. त्यानंतर मग त्यानं ते पैसे तिथं नेऊन टाकले. तिथं टाकल्यानंतर सहा-सात महिन्यांमध्ये तो कार्यक्रम बंद पडला. आपले सगळे फिक्सच होते. आपण काही व्याज-बिज उचललं नाही.”

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!