25.2 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

जनता विरोधी विशेष जन सुरक्षा कायदा ताबडतोब रद्द करा

जनता विरोधी विशेष जन सुरक्षा कायदा ताबडतोब रद्द करा

माजलगाव (प्रतिनिधी) शहरात विशेष जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने शहरातील चुन्नुमा रोड येथे दि ०६ ऑगस्ट गुरूवार रोजी सायंकाळी ७:०० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हा कायदा रद्द करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,आजाद क्रांती सेना,वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, मानवी हाक्क अभियान यांच्या वतीने करण्यात आली.हा कायदा लोकशाही विरोधी, संविधान विरोधी व जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा असून भांडवलदारी धार्जिना आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व फुले,शाहू, आंबेडकरवादी, मार्क्सवादी विचाराच्या चळवळी दाबल्या जाणार असून त्यांच्या विरोधातच या कायद्याचा हत्यार म्हणून वापर केला जाण्याची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर हा कायदा शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना, मजुरांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना, कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांना,दिन दलित दुबळे, आदिवासी व अल्पसंख्यांक समुदाय यांच्या बाजूने सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर सरकार या कायद्याअंतर्गत ते बेकायदेशीर कृत्य समजेल.अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर अत्यंत कडक शिक्षेची तरतूद असून लवकरात लवकर जामीन ही मिळणार नाही.आणि सरकारच्या विरोधी जो आवाज उठेल त्याला अर्बन नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याचे काम केले जाईल. म्हणून या कायद्याविरोधात मोठा लढा उभारून हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात पसरविण्याचे आवाहन या सभेच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर राज्यपालांनी या कायद्यावर स्वाक्षरी करू नये असेही आवाहन करण्यात आले.आणि येणाऱ्या काळात या मुद्द्यावर जनतेमध्ये जनजागृती करून या कायद्याचे गांभीर्य जनतेने ओळखावे यासाठी कृती समिती लढा उभारणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सिद्दिकी बाबा होते.शिवाजी कुरे, राजेश घोडे,विजय साळवे,कचरू तात्या खळगे, दयानंद स्वामी, ऑड.नारायण गोले पाटील,मोहन जाधव,नारायण होके,तुकाराम नावडकर,धम्मानंद साळवे,सचिन उजगरे,भारत तांगडे,अंकुश जाधव,ऑड याकुब सय्यद,नवनाथ धाईजे,फारुख आण्णा,राजेश क्षिरसागर इत्यादी नेत्यांनी संबोधित केले.या सभेचे सु‌त्रसंचालन अशोक ढगे यांनी केले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!