22.3 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

अजित दादा..! अशोक डक यांना पक्षातून हाकला..!

अजित दादा..! अशोक डक यांना पक्षातून हाकला..!

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले..
विधानसभा अध्यक्ष व तालुकाध्यक्षांची पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे तक्रार.

माजलगाव, दि. 30 प्रतिनिधी: येथील अशोक गोविंदराव डक यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले असल्याने त्यांचेवर कारवाई करावी तसेच पक्षाच्या नेत्याचे फोटो व पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई करून पक्षातुन हकालपटट्टी करावी अशी मागणी मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष व मतदार संघातील तालुकाध्यक्षांनी राष्ट्वादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचेकडे केली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अशोक डक यांनी २२९ माजलगाव विधानसभा मतदारसंघ ता. माजलगाव जि. बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात काम केले असून आता पक्ष सत्तेत आल्यानंतर ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेपर ला जाहिराती देवुन घड्याळाचे चिन्ह जाहिरातीत टाकले आहे. तसेच ना. अजित पवार हे माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असतांना तत्कालीन मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक होते. पदावर असतांना देखील यांनी त्यावेळेस पेपरला जाहिरात दिली नाही, स्वागताचे होल्डींग बॅनर लावले नाही. व आता सभेकडे फिरकल देखील नाहीत, ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे शहरभर होल्डींग लावुन व पेपरला जाहिरात देवुन मी स्वतः पक्षाचा नेता असल्याचे भासवत आहे. व माझी कधी न संपणारी प्रेरणा ना. अजित पवार आहेत असे भासवत आहेत. यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकत्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे अध्यक्षानी याची दखल घेवुन संबंधित व्यक्तीस पक्षाचे चिंन्ह व पक्षाच्या नेत्याचे फोटो वापरण्यास मनाई करावी व पक्षातुन कायमस्वरूपी हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर माजलगाव विधानसभा अध्यक्ष जयदत्त नरवडे, तालुकाध्यक्ष संभाजी शेजुळ, धारूर तालुकाध्यक्ष अमोल जगताप, वडवणी तालुकाध्यक्ष महादेव साबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!