प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांना हवेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश व सूचना : कास्ट्राईब
माजलगाव(प्रतिनिधी) येथील गेल्या अनेक वर्षापासून वादादित असूनसुद्धा प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेले रवींद्र महामुनी यांना महा.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने,वरिष्ठ कार्यालयास प्रतिद्वारे निवेदन दिले असता,त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला.तेव्हा त्यांना शासन निर्णयाद्वारे – वाचा देऊन,शिक्षणाधिकारी(प्रा)यांना सादर केलेल्या निवेदनात जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी व तालुकास्तरीय शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महासंघाची तीमाही बैठक आयोजित करावी याबाबतची आग्रही भूमिका मांडली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश व सूचना आल्यानंतरच आपली बैठक आयोजित करण्यात येईल असे लेखी पत्र महासंघास दिले आहे. त्यामुळे महासंघाच्या पदाधिकाऱ्यां बरोबर शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संताप व्यक्त केल्या जात आहे.
महासंघाच्या वतीने शिक्षकांच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मागील एक महिन्यापासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलना नंतर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू असून या आंदोलनाची म्हणावी तशी दखल वरिष्ठ कार्यालयाने न घेतल्यामुळे व पूर्णतः मागण्या मान्य नझाल्यामुळे,येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांना बळ पोहोचले आहे.महासंघाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत,शासन निर्णयानुसार-वाचा देऊन-वरिष्ठ कार्यालयास पाठवलेल्या निवेदनात,गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संबंधीत असलेल्या,एकूण प्रलंबित प्रस्तावांची संख्या व यादी देण्यात यावी,सर्विस बुक नोंदी नियमित प्रामाणित करण्यात याव्यात,गेल्या अनेक वर्षापासून मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी, महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली नसल्यामुळे,ती तीमाही नियमित आयोजित करण्यात यावी.व महासंघाचे वरिष्ठ कार्यालयास प्रति द्वारे निवेदन स्वीकारावे या मागण्या कळविण्यात आल्या होत्या.परंतु त्यावरही शिक्षणाधिकारी(प्रा) यांच्याकडूनही कोणतेच लेखी स्वरूपात उत्तर महासंघास अद्यापपर्यंत मिळालेले नाही.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांनी या मागण्या संदर्भाने महासंघास लेखी पत्र दिले असून त्यात, गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून वरिष्ठ कार्यालयास पाठवलेल्या प्रस्तावाच्या संख्यांची माहिती दिलेली आहे व याद्या संकलन सुरू असल्याचे,सर्विस बुक नोंदी नियमित प्रमाणित करण्यात येत असल्याचे,वरिष्ठ कार्यालयास प्रती निवेदन स्वीकारणे क्रमप्राप्त नसल्याचे म्हटले आहे.परंतु वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे.त्यांना मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे निवेदन स्वीकारणे क्रमप्राप्त म्हणजेच योग्य वाटत नाही.हे यावरून स्पष्ट जाणवते.तसेच तीमाही बैठक आयोजित करण्यासाठी सुद्धा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश व सूचना हव्या आहेत.वास्तविकता शासनाचेच असे पत्र आहे की,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यानी संघटनांची बैठक नियमित आयोजित करावी.या पत्रास केराची टोपली प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे दाखवली आहे,असे स्पष्ट निदर्शनास येते.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानी याची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे.असे महासंघाचे तालुकाध्यक्ष राहुलकुमार टाकणखार,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारत टाकणखार,ता.सचिव अभिमन्यू इबिते,वसंत टाकणखार,रवी आदमाने,निलेश गावडे,अजीमोमुद्दीन खतीब,हनुमंत पांढरपोटे, शिवाजी भाळशंकर,प्रवीण जाधव,अमोल राऊत,राहुल खुणे,प्रतीक स्वामी,किरण शिंदे,नारायण भाळशंकर,गोरख उघडे,जीवन डोंगरे,धोंडीराम रामुळे,राजेंद्र सातपुते,सय्यद अयुब,किरण माने,सुमेध घाडगे,शंकर पवार,गोविंद पवार, नितीन पुटवाड,शेख मतीन,बळीराम घनघाव,लव्हाळे सर ता.सल्लागार राजकुमार सोनवणे,कृष्णा हौसरमल,नागनाथ पडलवार, अविनाश येळबकर आदी पदाधिकारी,सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.