राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत लता जाधव तृतीय
माजलगांव (प्रतिनिधी)- शिक्षक क्लब ऑफ जलना तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त – निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेन राज्य बीड जिल्हास्तरावर तृतीय क्रमांका-च्या मानकरी जि.प. के. प्रा. शा. तालखेड, ता. माजलगावच्या शिक्षिका श्रीमतीलता भिमराव जाधव ( फंदे) यांनी यश संपादन केले आहे.हा सन्मान सोहळा जंईएस महाविद्यालय जालना येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा साहित्यिक एम.जी.जोशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून, गणेश आग्नहोत्री, कवयित्री भारती हेर कर, प्राचार्य अशोक खरात, आर.आर. जोशी, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व अध्यक्ष, राजेभाऊ मगर, सचिव दत्तात्रय इंगोले यानी नियोजन केले.